MLA Sanjay Shirsat | मराठा आंदोलनाला राज्यातील एका जेष्ठ नेत्याने चिथावणी दिली; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sanjay Shirsat | आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनावर (Maratha Reservation Protest) पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. जालन्यामध्ये (Jalna) आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला व गोळीबार यामुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले. हा आदेश राज्य सरकारनेच दिला असल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला. जालनामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषणाला बसले असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली आहे. या सर्व घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचे आरोप फटाळले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर माफी देखील मागितली आहे. मात्र आता यानंतर सत्तेमध्ये असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी काही वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य सध्या गाजत असून त्यांनी मराठा आंदोलन वाढवण्यासाठी एका जेष्ठ नेत्यांकडे रोख दाखवला आहे.
एका वाहिनीला मुलाखत देताना संजय शिरसाट म्हणाले की, “त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, या घटनेचा सर्वांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. मी सध्या अधिकृतपणे सांगू शकत नाही, परंतु माझी माहिती अशी आहे की या महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याने या मराठा आंदोलनाला चिथावणी दिली होती.” तो नेता कोण आहे? याची सरकारने चौकशी करावी अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे
उपोषणला बसले आहेत. राज्य सरकारने (State Government) लवकरात लवकरत जीआर न काढण्यास पाणी पिणे
देखील सोडणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. ते उपोषणावर अडून बसले असून आता त्यांची प्रकृती खालावली
आहे. यामुळे मराठा आंदोलकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान हे मराठा आंदोलन एका जेष्ठ नेत्याने पसरवल्याचा गंभीर आरोप संजय शिरसाट (MLS Sanjay Shirsat) यांनी केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | भोर आणि वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडवा