Chitra Wagh on INDIA Alliance Meeting | ‘घमंडिया आघाडीचा खेळ भरलाय न्यारा, संधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh on INDIA Alliance Meeting | विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील 28 विरोधी पक्षांचे प्रमुख मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये (Grand Hyatt Hotel) दाखल झाले आहेत. या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या या बैठकीवरुन भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. ‘घमंडिया आघाडीचा खेळ भरलाय न्यारा, संधिसाधूंचा मुंबापुरीत जमलाय गोतावळा सारा’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh on INDIA Alliance Meeting)

पोटात एक अन् ओठात एक, कसले पुरोगामी नि कसले डावे, खुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळे, अशा घोटाळेबाजांना काय म्हणावे? असं म्हणत चित्रा वाघ यांनी खोचक टोला लगावला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघात केला आहे. ‘#घमंडिया_आघाडी पंतप्रधान मोदीजी (PM Narendra Modi) विरोधात लढायला निघाले आहेत पण त्यांचा सेनापतीच अजून ठरत नाहीये…’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. (Chitra Wagh on INDIA Alliance Meeting)

घमंडिया आघाडीचा
खेळ भरलाय न्यारा
संधिसाधूंचा मुंबापुरीत
जमलाय गोतावळा सारा

इथं कोणाच्याच विचारांचा
कोणाशी बसत नाही मेळ
पण, हातात हात घेऊन
सुरू केलाय सत्तेसाठी खेळ

पोटात एक अन् ओठात एक,
कसले पुरोगामी नि कसले डावे
खुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळे
अशा घोटाळेबाजांना काय म्हणावे?

जनतेच्या ऊरावर बसलीत
केव्हापासून ही भ्रष्ट घराणी
पाप धुण्याही कमीच पडेल
ह्या अरबी समुद्राचे पाणी… असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

घमंडिया_आघाडी पंतप्रधान मोदीजी विरोधात लढायला निघाले आहेत पण त्यांचा सेनापतीच अजून ठरत नाहीये… राहुल गांधीचं (Rahul Gandhi) नाव घेतलं की ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) नाराज होते.. केजरीवालचे (Arvind Kejriwal) नाव घेतले की राहुल गांधी नाराज होतात… ममता बॅनर्जीचं नाव घेतलं की नीतीश कुमार (Nitish Kumar) नाराज होतात.. नितीश कुमारांचं नाव घेतलं की उद्धव ठाकरे नाराज होतात.. आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की सगळेच नाराज होतात.

या ठगबंधनात उद्धव ठाकरे हे संपलेल्या पक्षाचे नेते आहेत. ओसाड गावचे पाटील म्हणून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित आहेत. पण त्यांच्यावर कोणाचाही विश्वास नाहीए. आत्मविश्वास गमावलेले विरोधक एकत्र आले आहेत. त्यांना विश्वास आहे की मोदींना विरोध केला तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. यातून कळतंय की घमंडिया आघाडी आतून किती पोकळ आहे, असं देखील चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?, भाजपकडून हालचालींना वेग (Video)