MLA Sunil Tingre | लोहगाव उपजिल्हा रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार; आमदार सुनिल टिंगरे यांनी रूग्णालयाच्या कामाची पाहणी केली

लोहगाव : MLA Sunil Tingre | वडगाव शेरी मतदार संघातील (Vadgaon Sheri Constituency) लोहगाव येथे मंजूर असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगती पथावर आहे. गुरुवारी या रूग्णालयाच्या कामाची पाहणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली. अपूर्ण असलेली कामे लवकर पूर्ण करून रूग्णालय लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची सूचना अधिकार्‍यांना आमदार टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी केली.

मागील दोन वर्षांच्या काळात रूग्णालयाच्या कामामध्ये गती आली.
आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळविला.
डिसेंबर अखेर रूग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. नागरिकांच्या सेवेमध्ये मार्च २०२३ मध्ये रूग्णालय रूजू होणार आहे.
रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून, अंतर्गत सोयी सुविधा व उर्वरीत कामे गतीने पूर्ण केली जात आहेत.
आमदार सुनिल टिंगरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रूग्णालयाच्या सुधारित कामांसाठी आणखी २४ कोटी रुपए निधी मंत्रालयातून मिळाला आहे.
या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे.
रूग्णालयाच्या कामाची पाहणी करताना आमदार सुनिल टिंगरे यांच्या सोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, कार्यकारी अभियंता अजय भोसले, उप अभियंता जान्हवी रोडे, तसेच विद्युत विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सुसज्ज रूग्णालयाची गरज लवकरच पूर्ण

आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले कि वडगावशेरी मतदार संघातील नागरिकांना उपचाराकरिता ससून हॉस्पिटलला (Sassoon Hospital) जावे लागत आहे.
या परिसरात सरकारी व सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल उपलब्ध नाही.
अनेकदा नागरिकांना खासगी हॉस्पिटलवर अवलंबून रहावे लागत आहे.
लोकांच्या गरजा लक्षात घेऊन लोहगाव येथे सुसज्ज रूग्णालय बनविले जात आहे.
रूग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत येणार आहे.
या रूग्णालयामुळे गरीब व गरजवंतांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

Web Title :- MLA Sunil Tingre | Lohgaon Upazila Hospital will soon enter the service of citizens; MLA Sunil Tingre inspected the work of the hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी खोडून काढले धनंजय मुंडेंचे वक्तव्य, म्हणाल्या – रक्ताची नातीच कधीच संपत नसतात, मी कुणाशीही…

Pune Cyber Crime | बनावट लोन ॲपचा कॉलसेंटरचा पुणे पोलिसांकडून पर्दापाश; 18 आरोपी अटकेत, एक लाख लोकांचा गोपनीय डाटा पोलिसांच्या हाती