Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी खोडून काढले धनंजय मुंडेंचे वक्तव्य, म्हणाल्या – रक्ताची नातीच कधीच संपत नसतात, मी कुणाशीही…

मुंबई : Pankaja Munde | आमच्यात भाऊ-बहिणीचे नाते राहिले नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले, असे राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत म्हटले होते. यावर आता भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून एक बहिण म्हणून त्यांनी धनंजय मुंडेंचे वक्तव्य खोडून काढताना म्हटले की, रक्ताची नाती कधीच संपत नसतात.

पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मी कुणाशीही वैर बाळगत नाही. माझा कुणीही राजकीय शत्रू नाही. मी संबंधित व्यक्तींच्या विचारांसोबत राजकीय तुलना करत असते.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी म्हटले होते की, भगवान गडाच्या (Bhagwan Gad) दसर्‍याची परंपरा ही संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरू केली.
दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असेपर्यंत ही परंपरा सुरू होती.
आता कुणी मेळाव्याला जायचे कुणाला बोलवायचे, दसरा मेळाव्याला (Dasra Melava) केंद्रीय मंत्र्याला आमंत्रण का दिले नाही ते त्यांनाच विचारा.
आम्ही भाऊ-बहीण म्हणून राजकीय विरोधक आहोत.
आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावे हे ज्याने त्याने ठरवावे. मी त्याबाबत सांगण्यासाठी मी लहान आहे.

बीडमध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते.
मात्र, नंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेल्याचे त्यांनी म्हटले होते.
मी जनतेच्या मनात असेन तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हरवू शकत नाहीत, असे पंकजा मुंडेंनी म्हटले होते.
यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी, आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावे हे ज्याने त्याने ठरवावे.
मी त्याबाबत सांगण्यासाठी लहान आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title :- Pankaja Munde | blood realation never end this statement has been made by bjp leader pankaja munde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | बनावट लोन ॲपचा कॉलसेंटरचा पुणे पोलिसांकडून पर्दापाश; 18 आरोपी अटकेत, एक लाख लोकांचा गोपनीय डाटा पोलिसांच्या हाती