देशात आणखी एका भयंकर Coronavirus चा शिरकाव, अँटिबॉडीलाही देतोय चकवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (Uk corona new strain) आढळल्यानंतर संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. या नव्या कोरोनाचे रुग्ण भारतात देखील वाढत असून त्याची अनेकांनी धास्ती घेतली आहे. असे असताना आता दक्षिण आफ्रिकेतील महाभयंकर असा नवा कोरोनाही (south africa corona strain) भारतात शिरकाव केला असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईजवळ पोहोचला आहे. कोरोनाचे हे रुप भयंकर असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबईतल्या खारघरमधील टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील असे तीन रुग्ण आहेत, ज्यांच्यामध्ये E484K म्‍युटेशन असलेला कोरोना व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवा कोरोनाव्हायरस असल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील हा स्ट्रेन अधिक भयंकर आहे. कारण कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज या व्हायरसविरोधात लढण्यास प्रभावी नाहीत. हे रुग्ण ठाणे आणि रागयगडमधील असल्याचे समजते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार टाटा मेमोरिअल सेंटरचे डॉ. निखिल पाटकर यांनी यांनी सांगितले की, सेंटरच्या टीमने 700 नमुन्यांची जीन सिक्वेंसिंग केल होते. त्यापैकी तिघांमध्ये E484K म्युटेशन सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाव्हायरचे तीन म्युटेशन आढळून आले. आमच्या रुग्णालयातील रुग्णांंमध्ये सापडलेला व्हायरसचा स्ट्रेन हा त्याच तीन म्युटेशनपैकी एक आहे. दरम्यान यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाचे भारतात 90 रुग्ण आहेत. त्यापैकी 11 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 3, पुण्यात 2 आणि मिरा-भाईंदरमध्ये एक रुग्ण आहे.