MNS Chief Raj Thackeray | हे प्रशासनाला कळलं नाही का?, श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari) यांचा रविवारी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. मात्र, या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं. या कार्यक्रमात आलेल्या 11 जणांचा उष्माघातामुळे (Heat Stroke) मृत्यू झाला आहे, तर काही जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सोहळ्याला लागलेल्या गालबोटावरुन प्रशासनावर ताशेरे ओढले आहे. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.facebook.com/RajThackeray

राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? असा खरमरीत सवाल त्यांनी केला आहे.

सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना
पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे,
अशा शब्दात राज ठाकरेंनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title :-  MNS Chief Raj Thackeray | 11 people died due to heat stroke during the maharashtra bhushan award distribution ceremony

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune MahaVitaran News | पुणे न्यूज : ‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल महावितरणला पुरस्कार ! मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अभियंता संतोष पटनी यांनाही पुरस्कार

Sakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे

Pune Jt CP Sandeep Karnik | पुणे-आझम कॅम्पस : ‘रोझा इफ्तार व्हावे बंधूभावाचे व्यासपीठ’ – पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक