MNS Chief Raj Thackeray | अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे ? राज ठाकरेंचा सवाल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मशिदीवरील भोंग्याच्या (Azaan On Loudspeakers) विरोधात मनसेने आजपासून राज्यात आंदोलन (Agitation) सुरु केले आहे. ज्या मशिदींवर भोंगे लावून अजान दिली जाते त्या मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांकडून (Maharashtra Police) अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. तर काही कार्यत्यांकडून हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले यापार्श्वभूमीवर राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपली सायंकाळची पत्रकार परिषद रद्द करुन सकाळीच पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

 

मौलवींचे मानले आभार
मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न काही राजकीय नसून सामाजिक विषय असल्याचं आज पुन्हा एकदा म्हटलं. तसेच आजचं आंदोलन हे काही एका दिवसाचं नसून जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटलं. आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी आज पहाटे भोंग्यावरुन अजान न देता सहकार्य केलं अशा मौलवींचेही त्यांनी अभार मानले.

 

नांगरे पाटलांचा राज ठाकरेंना फोन
पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे – पाटील (IPS Vishwas Nangre -Patil) यांचा फोन आल्याची माहिती दिली. विश्वास नांगरे पाटील यांनी फोनवरुन मुंबईतील मशिदींच्या मौलवींशी बोलणं झालं असून ते पहाटेची अजान भोंग्यावरुन देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय दिवसभरातील अजान देखील सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानुसार होतील असं म्हटलं. परंतु आज मुंबईत मला मिळालेल्या माहितीनुसार 135 मशिदींवर पहाटे भोंग्यावरुन अजान झाली. याविरोधात कारवाई केली जाणार आहे की नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पोलीस डेसिबल मोजत बसणार का ?
राज ठाकरे म्हणाले, विश्वास नांगरे पाटील यांनी मला काल फोनवर आमच्याकडे एवढ्या मशिदींकडून परवानगीसाठी अर्ज आले आहे आणि त्यांना आम्ही परवानगी दिली असल्याची माहिती दिली. मूळात मुंबईतील मशिदी अधिकृत (Mosque Authorized) आहेत का ? अनधिकृत (Unauthorized) मशिदींवरील भोंगे पण अनधिकृतच आहेत. तुम्ही अनधिकृत मशिदींवरील भोग्यांना अधिकृत परवानगी देता. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ? त्यामुळे मशिदींवरील भोंगे उतलेच पाहिजेत. तुम्ही परवानगी देऊन पोलीस काय मग डेसिबल मोजत बसणार का ? दिवसभर पोलिसांनी काय हाच धंदा करायचा का ? त्यामुळे मशिदीवरील भोंगे उतरले गेलेच पाहिजे, असे ते म्हणाले.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | how are the loudspeakers in unauthorized mosques official raj thackeray question to vishwas nangre patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा