MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे ठाम ! ‘अभी नही तो कभी नही’; देशातील हिंदुंना पत्राद्वारे आवाहन ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे (Azaan On Loudspeakers) हटवण्याबाबत इशारा दिल्यानंतर राज्यात पोलीस यंत्रणा (Maharashtra Police) सतर्क झाली आहे. गुढीपाडव्याच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ही भूमिका मांडली. त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत मनसेने 3 मे पर्यंत सरकारनं सर्व मौलवींशी चर्चा करुन अनाधिकृत भोंगे हटवावे अन्यथा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावू असा अल्टिमेटम दिला आहे. परंतु सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांनी देशभरात केंद्राने भोंगे हटवण्यासंदर्भात नियमावली बनवावी अशी मागणी करत केंद्राकडे चेंडू टोलवला आहे.

 

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार अनाधिकृत भोंगे हटवावे या मागणीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ठाम आहेत.
भोंगे हा सामाजिक विषय आहे हा धार्मिक विषय नाही. अभी नही तो कभी नही असं म्हणत राज ठाकरे यांनी एकदाच काय ते होऊन जाऊ द्या असा इशारा औरंगाबादच्या सभेत (Aurangabad Public Rally) दिला.
4 मे पासून ऐकणार नाही असंही ते म्हणाले होते.
मनसेच्या अल्टीमेटमला काही तास शिल्लक असताना राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून आणि गृहविभागाकडून (Maharashtra Home Minister) बैठका घेतल्या जात आहेत.
तर दुसरीकडे शिवतीर्थ येथे मनसेच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये भोंग्याबाबत चर्चा झाली.

राज ठाकरेंचे पत्राद्वारे आवाहन ?
मनसे प्रमुख राज ठाकरे भोंगे हटावच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अभी नही तो कभी नही सांगत देशभरातील हिंदूंना राज ठाकरे पत्राद्वारे आवाहन करणार आहे.
या पत्रकात राज ठाकरे भोंग्याविरोधातील भूमिका कशी योग्य आहे हे लोकांना मुद्यांसह पटवून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांचे हे पत्र थोड्याच वेळात अधिकृतपणे पुढे येईल असंही म्हटलं जात आहे. हे वृत्त टीव्ही 9 नं दिलं आहे.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | MNS Chief raj thackeray appeal to hindus across the country by letter over loudspeakers on mosque

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा