Pune Crime News | हडपसर : स्पिकरचा आवाज कमी करायला सांगितल्याने मारहाण करुन माजविली दहशत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | विसर्जन मिरवणुकीतील स्पिकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने टोळक्याने मारहाण (Beating) करुन मांजरीत दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत बाळासाहेब वसंत घुले (वय ५०, रा. गावठाण मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४४५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बिट्या ऊर्फ स्वप्निल संजय कुचेकर (Bitya alias Swapnil Sanjay Kuchekar), हर्षल सुरेश घुले Harshal Suresh Ghule (वय २०), केतन संतोष घुले Ketan Santosh Ghule (सर्व रा. मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हर्षल घुले याला अटक केली आहे. हा प्रकार मांजरीत रविवारी रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहते घरासमोर गणपती विसर्जन (Ganpati Visarjan 2023) मिरवणुक आली होती. त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीने स्पिकरचा आवाज कमी करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीचे पत्नी व शेजारील मुलींना शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी पोलीस नित्रयंण कक्षाला (Pune Police Control Room) फोन करुन स्पिकरचा आवाज कमी करुन घेतला. याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. लोखंडी रॉड व दांडके हवेत फिरवून मोठ्याने धमक्या देऊन परिसरात दहशत माजविल्याने गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे (API Dabhade) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या
ऐवजी बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे;
प्रकल्प राबविल्यास मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी.
पर्यायी रस्ता तयार होणार !