MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके (Shivsena Candidate Rituja Latke) यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र देऊन अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri By-Election) माघार घेण्याची विनंती केली होती. यानंतर काही तासातच शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीही पत्रकार परिषद घेऊन अंधरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले. यानंतर भाजपने काल माघार घेतली होती. यावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असताना मनसेने यावर वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंना (MNS chief Raj Thackeray) क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.

मनसे पक्ष संघटन बांधणी व नागपूर शहर कार्यकारिणी नियुक्त करण्यासाठी संदीप देशपांडे, अविनाश जाधव (Avinash Jadhav), राजू उंबरकर (Raju Umbarkar) आज नागपुरात दाखल झाले. नागपुरच्या रविभवनात दिवसभर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी पत्रकार परिषदेत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आरोप केला की, अंधेरीतील पोटनिवडणुकीत लटके यांना समर्थन देण्याचे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी केले. निवडणूक बिनविरोध झाल्यास त्याचे श्रेय राज ठाकरे यांना जाऊ नये म्हणूनच शरद पवार यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली.

संदीप देशपांडे म्हणाले की, सामना हे वृत्तपत्र असल्याचे आम्ही मानतच नाही. ते आत्मस्तुतीसाठी काढले जाणारे पत्र आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडे आता बराच वेळ असल्यामुळे ते वाटेल ते लिहत असतात. दिवाळी तोंडावर असताना नागरिकांना रेशनचे किट मिळालेले नाही. याच्या टेंडरमध्ये घोळ असल्याची माहिती समोर येत आहे, याबाबत चौकशी करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली.

नागपूर शहरातील समस्यांवर बोलताना देशपांडे म्हणाले, नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, प्रत्यक्षात पुरेसे पाणी मिळत नाही व बील मात्र भरमसाठ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
येत्या काळात ही परिस्थिती सुधारली नाही तर पाणीपुरवठा अधिकार्‍यांना मनसे रस्त्यावर फिरु देणार नाही.

मनसे संघटन प्रक्रियेवर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, यावेळी विचरपूर्वक व संपूर्ण माहिती घेऊन नियुक्त्या केल्या
जात आहेत. आमच्याकडे नागपुरातील 450 पदाधिकार्‍यांची यादी तयार आहे.
मात्र, मनसेला कार्यकर्ते मिळत नाही, अशा चुकीच्या बातम्या हेतूपुरस्सर पसरविल्या जात आहेत.
लवकरच राज ठाकरे यांच्याहस्ते नागपुरात मुख्य कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे, असे देशपांडे म्हणाले.
यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बागडे व चंदु लाडे उपस्थित होते.

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | sharad pawar holds press conference so that raj thackeray should not get credit says mns leader sandeep deshpande

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांची कुडाळमधून चौफेर फटकेबाजी; ‘त्या’ घटनेची आठवण करुन देत भाजपवर केला प्रश्नांचा भडीमार

Sushma Andhare | सुषमा अंधारे माध्यमांचे आवडते बाळ आहेत, भाजपचा खोचक टोला

Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना