MNS | उद्धव ठाकरेंकडून दीड वर्षीय बाळाचा उल्लेख, मनसेनं करुन दिली बाळासाहेबांची आठवण

मुंबई : MNS | दसरा मेळाव्यातील (Dasra Melava 2022) भाषणांवरील आरोप-प्रत्यारोप, टीका अजूनही सुरूच आहे. उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घराणेशाहीवर टीका करताना त्यांच्या छोट्या नातवाचा उल्लेख केला होता. बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे, असे ठाकरे यांनी म्हटले होते. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिले. त्यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी भावनिक पद्धतीने व्यक्त केली आहे. आता शिवसेना आणि शिंदे गटाच्या या वादात मनसेने (MNS) नेहमीप्रमाणे उडी मारली आहे.

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने दुखावलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना खुले पत्र लिहिले आहे. या वादात उडी मारत मनसेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करत म्हटले आहे की, खोके, गद्दार, खंजीर, सगळं समजू शकतो पण त्या दीड वर्षाच्या ‘बाळाचा‘ केलेला उल्लेख माननीय बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) पण आवडला नसता. दरम्यान शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Demons) यांनी उद्धव ठाकरेंची ती टीका व्यक्तीगत हेतूने नव्हती. तर, राजकीय विरोधातून होती, असे म्हटले आहे.

श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात
खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का? उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो का?

Web Title :- MNS | eknath shindes 15 year old grandson of eknath shinde mns reminded balasaheb didnt like it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shimron Hetmyer | ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी

Madhuri Misal | माधुरी मिसाळ यांनी सत्य मांडताच कार्यकर्ते खुश, म्हणाल्या – ‘चंद्रकांतदादा, पुण्यातील नेते मंडळी तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना…’