MNS Leader Sharmila Thackeray | आदित्यची बाजू घेतल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मानले आभार, पण शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ”जो भाऊ तुमच्यासोबत…”

मुंबई : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aditya Thackeray) यांची दिशा सालियान प्रकरणी (Disha Salian Case) चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केल्यानंतर मनसे नेत्या शर्मिला ठाकरे (MNS Leader Sharmila Thackeray) यांनी आदित्य असे करणार नाही, असे म्हणत बाजू घेतली होती. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांचे आभार मानले होते. मात्र, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शर्मिला ठाकरे (MNS Leader Sharmila Thackeray) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवडी येथील मनसेच्या कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, आभार मानायची वेळ मला आयुष्यात उद्धव ठाकरेंनी कधीच दिली नाही. किणी प्रकरणापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत बसतात. निदान जो भाऊ तुमच्यासोबत लहानापासून मोठा झाला त्याच्यावर थोडा तरी विश्वास ठेवला असता ना तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ आली असती. जी आता त्यांच्यावर आली आहे.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला. तो असे करेल मला वाटत नाही. परंतु तुम्ही ज्या भावासोबत मोठे झालात त्या भावाची किणी प्रकरणावेळी मदत का केली नाही? किणी प्रकरणावरून आजपर्यंत टोमणे देणे कधी थांबवले आहे का? सतत टोमणे देत राहतात. तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा मग आम्हीदेखील आभार मानू.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर (Dharavi Redevelopment Project) शर्मिला ठाकरे (MNS Leader Sharmila Thackeray) म्हणाल्या, धारावीचा विकास सरकारने करावा असे तुम्हाला वाटत होते मग तुम्ही निर्णय घ्यायला हवा होता. तुम्हाला कुणी अडवले होते? कोणतेही चांगले निर्णय घ्यायला कुणी थांबवले होते का?

धारावीचा विकास सरकारला करायचा होता मग करून टाकायचा. कुणी तुमचे हात धरले होते? आपल्याकडे टाटांसारखे अनेक ब्रँड आहेत. धारावीच्या विकासाचे टेंडर काढून त्यात जो कुणी चांगला आहे त्याला काम द्यायला हवे होते, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) त्या म्हणाल्या, राज्यात मराठ्यांचे आंदोलन सुरू आहे.
आज जे विरोधी पक्षात असतील किंवा सर्वच पक्ष असतील मराठ्यांना आरक्षण द्या असे म्हणत आहेत,
मग तुम्ही सत्तेत असताना कुणी अडवले होते. तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिले नाही?

शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या, सर्व गोष्टीला कोविडचे कारण दिले जाते. परंतु, कोविड काही महिन्यांनी सुरू झाला.
मराठ्यांचे आंदोलन हे वर्षानुवर्षे सुरू आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचे होते मग तेव्हा द्यायचे होते.
तुम्ही विधानसभेत विधेयक पास करायचे होते. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुमतात सरकारमध्ये होता.
मग तेव्हा आरक्षण देऊन टाकायचे होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, तिघांवर FIR; लोणी काळभोर परिसरातील घटना

किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक, धनकवडी येथील प्रकार

अश्लील हावभाव करुन महिलेचा विनयभंग, भवानी पेठेतील प्रकार