MNS | फटाक्यांवरुन पोलिसांत तक्रार करणाऱ्या मुस्लीम व्यक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळी असल्याने सगळीकडे फटाक्यांचा उत्सव सुरु आहे. लहान थोर रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवित आहेत. कांदिवलीतील एका मुस्लीम व्यक्तीने याबाबत ट्विट करत पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यावर मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिवाळी आहे. फटाके वाजणार, तुमची अजान आम्ही वर्षभर सहन नाही करत का, असा प्रश्न मनसेने (MNS) विचारला आहे.

कांदिवली येथील सलमान खान (Salman Khan) नावाच्या एका इसमाने ट्वीटरवर पोलिसांना संदेश पाठवून रात्री उशिरापर्यंत फटाके वाजविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची विनंती केली आहे. “ऑस्कर रुग्णालय, गणेश नगर, कांदिवली पश्चिम येथे रात्री 2 वाजले असून देखील फटाके फोडले जात आहेत” अशी तक्रार करण्यात आली. यावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या इसमाला उत्तर पाठवत आम्ही कांदिवली पोलीस ठाण्यात (Kandivali Police Station) कळविले आहे, असे म्हटले आहे.

त्यावर मनसेचे नेते मनोज (MNS) चव्हाण (Manoj Chavan) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे.
आम्ही रोज फटाके फोडत नाही. मात्र, तुमची अजान अजूनही भोंग्यावर अनेक ठिकाणी सुरू आहे.
थोडे सहन करा, कारण दिवाळी आहे, असे मनोज चव्हाण यांनी ट्वीट केले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा मध्ये काही काळ विश्रांती घेऊन मनसे मशिदींवरील भोग्यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे.
मागील काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत
अशी मोहीम उघडली होती. त्यावर मोठा वाद देखील पेटला होता.
मनसेच्या या आंदोलनाला आणि मागणीला भाजपचा (BJP) देखील पाठिंबा होता.

Web Title :- MNS | mns manoj chavan tweet diwali firecrackers masjid loudspeaker mumbai police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Police | 60 लाख पुणेकरांना कोंडीत अडकवणारे वाहतूक पोलिस अधिकारी निर्धास्त कसे ! बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये कर्तव्यदक्षतेपेक्षा ‘वशिला’ आणि ‘पैसा’च चालतो हा समज पक्का होतोय

CM Eknath Shinde | ‘नथुराम’च्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले, शरद पोंक्षेंनी CM शिंदेंसमोर सांगितल्या अनेक आठवणी

Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकरांचे जयंत पाटलांबद्दल भाकीत आणि राष्ट्रवादीत गोंधळ