MNS on Mumbai Goa Highway | राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक, मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचे कार्यालय फोडले

माणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – MNS on Mumbai Goa Highway | जवळपास मागील दीड दशकांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या (MNS on Mumbai Goa Highway) मुद्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गासाठी असे आंदोलन करा की लक्षात राहील असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला होता. यानंतर कार्यकर्त्यांनी महामार्गाच्या माणगाव येथील ठेकेदाराच्या कार्यालयाची तोडफोड (Contractor Office Vandalism) केली. जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड (Devendra Gaikwad) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आली.

पनवेल येथे झालेल्या मनसेच्या निर्धार मेळाव्यानंतर रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग (MNS on Mumbai Goa Highway) कामाच्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर काही वेळातच याचे पडसाद बुधवारी माणगाव तालुक्यात उमटले आहे. इंदापूर ते लाखपाले माणगाव बायपासचे (Indapur to Lakhpale Mangaon Bypass) काम चेतक इंटरप्रायझेस (Chetak Enterprises) अंतर्गत सनी कन्स्ट्रक्शन कंपनी (Sunny Construction Company) करत आहे. त्या कंपनीच्या गणेश नगर माणगाव येथील कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी गदारोळ घालत खुर्चा आणि फर्निचर साहित्याची मोडतोड केली. सुदैवाने यावेळी कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याने ते बचावले आहेत.

जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कार्यकर्ते संध्याकाळी साडे चारच्या सुमारास या ठेकेदाराच्या कार्यालयात घुसले त्यानी घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान या घटनेची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी गंभीर दखल घेतली असून, कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे (FIR)दाखल करून आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांना दिले आहेत.

मुंबई-गोवा हायवेवर किती खर्च…

2007 साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार (Congress Government)
गेले शिवसेना-भाजपचे सरकार (Shiv Sena-BJP Government) आले.
त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले.
या खड्ड्यांतून जात असताना त्याच त्याच पक्षातील लोकांना कसे मदतान करता याचे आश्चर्य वाटतेय.
खड्ड्यातून आम्ही खड्यातून गेलो काय किंवा खड्यात गेलो काय?
महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का, यांना एकदा धडा शिकवायला हवा, नुसती आश्वासनं देतात.
मुंबई-गोवा महामार्गावर 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र रस्ता झालेला नाही. बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट

MNS Chief Raj Thackeray | ‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत, ह्यांनी कोव्हीड पण…’ राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

New Housing Scheme | शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित