MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर

मुंबई : MNS On Shivsena | दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिवसेना आणि शिंदे गटाची (Shinde Group) जोरदार तयारी सुरू आहे. टीझर, बॅनरच्या माध्यमातून हे दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, तसेच कार्यकर्त्यांना मेळाव्याला येण्याचे आवाहन करत आहेत. शिवाय, दोन्हीकडील नेते आमचाच दसरा मेळावा खरा, आमच्याच मेळाव्याला मोठी गर्दी होणार, असे दावे-प्रतिदावे करत आहेत. आता यात मनसेने उडी घेतली आहे. दसरा मेळाव्यावरून मनसेने शिवसेनेवर टीका (MNS On Shivsena) केली आहे.

मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी एक ट्विट केले असून यात म्हटले आहे की, शिवतीर्थावरच्या (Shivtirtha) टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर. दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी (Abu Azmi) आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा. यासोबतच शिल्लकसेना असा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यात म्हटले आहे, छत्रपतींनी आपल्याला शिकवलं कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही, शिवसेनेचा हा टीझर पाठीत खंजीर खुपसणार्‍यांना उद्देशून बनवण्यात आला असल्याने त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (MNS On Shivsena)

यापूर्वी देखील शिवसेनेने दसरा मेळाव्याचा एक दमदार टीझर शेअर केला होता.
यात ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान… एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर 5 ऑक्टोबर 2022, सायं. 6.30 वा‘ असे म्हटले होते.
आणखी एका टीझरमध्ये शिवसेनेने म्हटले होते, निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार,
महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Web Title :- MNS On Shivsena | mns gajanan kale slams shivsena uddhav thackeray ncp over dasara melava

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Womens Asia Cup | टीम इंडियाने मलेशियाविरुद्धच्या सामन्यात आशिया कपमध्ये केला ‘हा’ नवा रेकॉर्ड

Dasara Melava 2022 | पुण्यात युवासेनेने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ; मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात, काळ…