Dasra Melava 2022 | पुण्यात युवासेनेने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ; मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात, काळ…

Dasra Melava 2022 | banner display by yuva sena in pune on the occasion of dasara melava
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेळावे (Dasra Melava 2022) हे निष्ठावंतांचेच असतात…काळ कसोटीचा आहे पण काळाला सांगा…वारसा संघर्षाचा आहे, असा मजकूर असलेला बॅनर सध्या पुण्यात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे पुण्यात शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच या बॅनरवरील मजकुराने पुन्हा एकदा शिंदे गटाच्या (Shinde Group) जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. शिवसेना नेते शिंदे गटातील आमदारांचा सातत्याने गद्दार म्हणून उल्लेख करत असतात. आता दसरा मेळाव्यावरून (Dasra Melava 2022) पुन्हा एकदा शिंदे गटाला युवासेनेने डिवचले आहे.

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पुण्यातील गाठीभेटी सध्या वाढल्या असून ते पुण्यातील छोट्या मोठ्या कार्यक्रमांना भेटी देत आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये (Shiv Sainik) उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बॅनर हे सामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात मोठी चढाओढ लागली आहे. शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे तर बंडखोर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर (BKC Ground) होणार आहे. या मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाने मोठे तयारी चालवली आहे. यासाठी राज्यभरातून लोक आणण्यासाठी एसटी महामंडळाकडे 4500 गाड्यांची मागणी करण्यात आली आहे.

 

विशेष म्हणजे आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला (Dasra Melava 2022) शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत मातोश्रीच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुद्धा शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. मातोश्रीबाहेर लावलेला बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादीने मुंबईत हे बॅनर्स लावले आहेत. या बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), सचिन अहिर (Sachin Ahir), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो आहे.

एक संघटना, एक विचार आणि एकच मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या, खूप खूप शुभेच्छा, असे म्हणत राष्ट्रवादीने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई सचिव दिनेशचंद्र हुलवळे, राजू घुगे यांनी हे बॅनर्स लावले आहेत.

 

ठाकरे गटाने दसरा मेळाव्याजी (Dasra Melava 2022) जोरदार तयारी केली आहे.
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमवण्याची योजना आहे.
विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे.
तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे.
न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना दिले आहेत.

 

तर दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसीतील दसरा मेळाव्यासाठी अवाढव्य खर्च करत जय्यत तयारी केली आहे.
सर्व आमदार, नेते मुंबईत दाखल झाले आहेत.
मेळाव्यासाठी माणसे आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो गाड्या बुक करण्यात आल्याचे त्यांचे आमदार सांगत आहेत.

 

शिंदे गटातील सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी लोक घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एकटे अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी 300 एसटी बस बुक केल्या आहेत.
तर शिंदे गटातील आमदारांनी 4 हजार 500 गाड्यांची मागणी महामंडळाकडे केली आहे.
शिंदे गट 5 लाख लोकांना बीकेसीच्या मैदानावर आणणार आहे.

Web Title :- Dasra Melava 2022 | banner display by yuva sena in pune on the occasion of dasara melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राज्यात दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी, शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

Legends League | LIVE मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन्सनकडून युसूफ पठानला धक्काबुक्की

Ind vs SA T20 | चक्क अम्पायरच नियम विसरले, गुवाहाटीत अम्पायर्सने केली ‘ही’ मोठी चूक

Total
0
Shares
Related Posts