काय सांगता ! होय, TV च्या खरेदीवर चक्क 77 हजारांचा स्मार्टफोन फ्री, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिपब्लिकन डे च्या निमिताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगसोबत अन्य कंपन्यांनी अनेक ऑफर आणल्या आहेत. यात, सॅमसंगने आपल्या टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि मायक्रोवेव यासारख्या उत्पादनावर १५ टक्के कॅशबॅक, ईएमआय आणि झीरो डाऊन पेमेंट यासारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यासर्वांत सॅमसंगने सर्वात जबरदस्त ऑफर आपल्या QLED या 4KUHD या टीव्हीवर दिल्या आहेत. सॅमसंगचा या टीव्हीच्या खरेदीवर ग्राहकांना ७६ हजारांपर्यंतचा स्मार्टफोन मोफत मिळणार आहे.

सॅमसंगने या ऑफरमध्ये ग्राहकांना Samsung QLED आणि 4K UHD टीव्हीच्या काही उत्पादनावर अनेक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये ७६ हजार ९०० रुपये किंमतीचा गॅलेक्सी एस. १० (५१२ जीबी) १९ हजार ९९९ रुपये किंमतीचा गॅलेक्सी ए ५० एस (४ जीबी) १६ हजार ९०० रुपये किंमतीचा गॅलेक्सी एम ३० (६ जीबी) ८ हजार रुपये किंमतीचा गॅलेक्सी ए. १० एस आणि ३ हजार ७९९ रुपयाचा सॅमसंग यू फ्लेक्स हेडफोन यासारख्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

एवढेच नव्हे तर कंपनी ग्राहकांना या बक्षिसासोबत ३० दिवसाचा झी ५ सब्सक्रिप्शन फ्री मध्ये देणार आहे. सॅमसंगचा हा सेल अल्पायन्स स्टोरवर सुरू आहे. तसेच माय सॅमसंग माय ईएमआय सर्विस वर सुरू होणार आहे. तसेच कंपनीकडून ३१ जानेवारी पर्यंत काही उत्पादने खरेदी केल्यावर ग्राहकांना २ वर्षापर्यंत वॉरंटी आणि १० वर्षाची नो स्क्रीन बर्न – इन वॉरंटी देण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –