‘मॉडेलिंग’नंतर तिची सेक्स रॅकेटमध्ये ‘एन्ट्री’, ‘या’ कारणामुळं घेतला 2 निष्पाप मुलांचा जीव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मॉडेलच्या रुपात चर्चेत आलेल्या आणि नंतर वेश्याव्यवसायाकडे वळालेल्या 23 वर्षीय लुईस पोर्टोन हिने आपल्या दोन मुलांची फक्त या कारणाने हत्या केली की तिला ग्राहकाकडे जायचे होते. या निर्दयी हत्येनंतर न्यायालयाने तिला जन्म ठेपेची शिक्षा सुनावली.
मॉडेलने हे मान्य केले की तिला वेश्या व्यवसायासाठी जाण्यास उशीर होत होता आणि त्यात ही दोन मुले बाधा ठरत होती. या कारणाने तिने एका 3 वर्षाच्या आणि दुसऱ्या 16 महिन्यांच्या निरागस मुलांची हत्या केली. ही घटना ग्रेट ब्रिटनमधील डर्बीशायर येथे घडली.
britain
लुईसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तीला डर्बीशायरच्या फॉस्टन हाल निक येथे लॉकअपमध्ये ठेवण्यात आली आहे. लुईस हिला सेक्सची इतके वेड लागले होते की तीचा एक मुलगा हॉस्पिटलमध्ये मरत होता तेव्हा देखील ती आपल्या एका क्लाइंटला सेक्ससाठी ऑफर करत होती.
britain
लुईसच्या भावाने सांगितले की, लुईसला तिच्या आजीच्या मृत्यूनंतर घरापासून वेगळे केले होते. लुईसने आपल्या आजीच्या अंतिम संस्कारासाठी जाण्यास देखील नकार दिला होता. जेव्हा आजी आजारी होती तेव्हा देखील ती रुग्णालयात भेटण्यास आली नाही. दोन मुलांच्या हत्येनंतर लुईसचे मित्र, नातेवाईक देखील हैराण झाले की, एक आई इतकी क्रुर आणि वाईट कशी असू शकते. ही घटना 14 – 15 जानेवारी 2018 दरम्यान घडली होती.

 

You might also like