Modi Cabinet Decisions | केंद्र सरकारने 15,000 कोटी रुपयांच्या एफडीआय प्रस्तावाला दिली मंजूरी, जाणून घ्या कसा वाढणार रोजगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Cabinet Decisions | केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक (FDI) बाबत आज मोठ निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या (Modi Cabinet Decisions) आर्थिक प्रकरणांच्या समिती (CCEA) च्या बैठकीत कॅनडाच्या पेन्शन फंड (Pension Fund) ची सहयोगी अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडच्या 15,000 कोटी रुपयांच्या एफडीआय प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. या रक्कमेचा वापर लॉजिस्टिकसह विमानतळांशी संबंधीत सेवा आणि विमानन संबंधीत उद्योग आणि सेवांसाठी होऊ शकतो.

पायाभूत सुविधांच्या विकास योजनांना मिळेल मदत

अधिकृत वक्तव्यानुसार, गुंतवणुकीत बेंगळुरु अंतरराष्ट्रीय विमानतळ भागीदारीत अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडला हस्तांतरण करण्याचा समावेश आहे.
याशिवाय ओंटारियो इंककडून अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 950 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.

ओंटारियो इंक, ओएसीची पूर्ण सहयोगी आहे, ज्या ओएमईआरएसचे संचालन करतात.
ही कॅनडातील सर्वात मोठा लाभ देणार्‍या पेन्शन योजनांपैकी एक आहे.
या गुंतवणुकीतून पायाभूत संरचना आणि बांधकाम क्षेत्रासह विमानतळ क्षेत्राला वेग मिळेल.

NMP ला सुद्धा या एफडीआयकडून मिळेल वेग

या प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीतून इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी आर्थिक मदतीसाठी देशाची मालमत्ता बाजरात सादर करण्याच्या याच आठवड्यात घोषित केलेल्या नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईनला सुद्धा वेग मिळेल.

कॅनडाच्या कंपनीचा भारतीय मालमत्ता घेण्याचा प्रस्ताव

अँकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडने नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन (NMP) अंतर्गत येणार्‍या देशाच्या काही मालमत्ताशी संबंधीत क्षेत्रात गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे.
अधिकृत वक्तव्यानुसार, गुंतवणुकीतून रोजगार सुद्धा निर्माण होती असा दावा केला जात आहे.

 

Web Title : Modi cabinet decisions central government approves fdi of rupees 15000 crores know how employment would increase

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Update | सोन्याच्या खरेदीसाठी सध्या करू नका घाई, दिवाळीपर्यंत 45000 रुपयांपर्यंत येऊ शकतो भाव, जाणून घ्या कारण

Pune Police | पुणे पोलिसांची सतर्कता ! मानासिक रुग्ण कुटुंबात सुखरुप परतला

BJP MLA Rahul Kul | भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई