Modi Government । मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ वाहनांसाठी नोंदणी शुल्क आणि RC शुल्क माफ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात सतत वाढणाऱ्या इंधनाच्या किंमती पाहता या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकारने (Modi Government) इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जात आहे. या अनुषंगाने मंगळवारी मोदी सरकारकडून (Central Government) एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांवरील (Electric Vehicles) नोंदणी शुल्क घेण्यात येत होती. आता मात्र, नोंदणी शुल्क (Registration Fee) माफ करण्यात आली आहे. याबाबत परिवहन मंत्रालयाकडून (Ministry of Transport) आदेश जारी करण्यात आला आहे.

या अगोदर केंद्राने (Central Government) स्क्रॅपेज पॉलिसीतही इलेक्ट्रिक वाहनांना सूट देऊ केली होती. मात्र, आता इलेक्ट्रिक वाहनांवर नोंदणी शुल्क अथवा नुतनीकरणासाठी (RC) आकारले जाणारे शुल्क देखील माफ होणार आहे.
म्हणून, तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले तर तुम्हाला त्यावर कोणतीही नोंदणी शुल्क भरावी लागणार नाही. याचबरोबर भविष्यात तुम्हाला वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) साठी देखील शुल्क द्यावे लागणार नाहीत.

केंद्र सरकारने (Central Government) घेतलेल्या निर्णयातून त्यांच्या नियमानुसार
केवळ इलेक्ट्रिक कारसाठी लागू नसून बॅटरीवर चालणाऱ्या सर्व वाहनांसाठी लागू असणार आहे.
त्यामध्ये, दुचाकी, तीन चाकी अथवा चार चाकी देखील असणार आहेत.
दरम्यान, म्हणून पुढील काळात जास्तीत जास्त नागरिक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करतील
, अशी एक अपेक्षा केंद्राची आहे.
मुख्यतः म्हणजे, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने (Union Ministry of Roads and Transport) याआधी स्क्रॅपिंग सर्टिफिकेट (Scraping certificate) असणाऱ्या खासगी वाहनांना रस्ते
करात 25 टक्के तर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना 15 टक्के सूट देऊ केली होती.
हे धोरण येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता निर्माण झालीय.

 

 

या दरम्यान, कन्वर्जेन्स एनर्जी सर्विसेज लिमिटेड आणि HPCL संयुक्तपणे मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे या शहरांमध्ये EV चार्जिंग पॉईंटसची (Charging points) उभारणी करेल. तसेच, महानगरातील प्रमुख महामार्गांच्यालगत ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आहे.
तीव्र, मध्यम आणि कमी अशा तीन स्वरुपांमध्ये हे चार्जिंग पॉईंटस असणार आहे.
या चार्जिंग स्टेशन्सचा कारभार सीईएसएल APP द्वारे हाताळला जाणार आहे.

 

Web Title : Modi Government | electric vehicles registration fee and rc fee waived off by central govt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Police | हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडीओ बनवणं पोलीस कर्मचाऱ्याला पडलं महागात; तडकाफडकी निलंबन (व्हिडीओ)

Crime News | मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरची तब्बल 4 लाख रुपयाची फसवणूक

Aadhaar Card चे enrollment status ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस