Modi Government | गरीबांसाठी खुशखबर ! मोदी सरकार देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, तात्काळ करा ‘हे’ काम; जाणून घ्या
नवी दिल्ली : Modi Government | कोरोना व्हायरस संसर्गाच्या महामारीत सामान्य लोकांपासून उद्योगपतींपर्यंत सर्वांनाच मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. संसर्ग आता मंदावला असला तरी धोका अजूनही आहे. अशा स्थितीत कमजोर कामगारांच्या मदतीसाठी सरकार पुढे येत असून मोदी सरकारने (Modi Government) ई-श्रम पोर्टल (e-SHRAM) लाँच केले आहे.
e-SHRAM पोर्टलद्वारे प्रत्येक कामगाराचा रेकॉर्ड सरकारजवळ राहील. सुमारे 38 कोटी मजूरांसाठी 12 अंकाचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर सुद्धा दिला जाईल, जो देशभरात मान्य राहील. सरकारच्या या उपक्रमाने देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना एक नवीन ओळख मिळेल.
Rangnath Vani | शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन
– कामगारांना या योजनांचा होईल फायदा
सरकारच्या या घोषणेनंतर आता असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा फायदा मिळेल. केंद्रीय कामगार आणि रोजागार मंत्रालयाकडून कामगारांना 12 अंकांचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर जारी केला जाईल.
जर कुणी श्रमिक ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले तर त्यास 2 लाख रुपयांचा अॅक्सीडेंटल विम्याचा लाभ मिळेल. यामध्ये एक वर्षाचा प्रीमियम सरकारकडून दिला जाईल. रजिस्टर्ड मजूराचा अपघात मृत्यु झाला किंवा पूर्ण अपंगत्व आले तर 2 लाख रुपयांची रक्कम मिळेल. आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळतील.
– असे करा रजिस्ट्रेशन
1. कोणत्याही इंटरनेट ब्राऊझरच्या सर्चमध्ये e-SHRAM पोर्टल पेजचा अधिकृत वेब अॅड्रेस – https://www.eshram.gov.in/ टाइप करा.
2. यानंतर होमपेजवर, ई-श्रमवर नोंदणी करा च्या लिंकवर क्लिक करा.
3. यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन https://register.eshram.gov.in/#/user/self वर क्लिक करा.
4. सेल्फ रजिस्ट्रेशनवर यूजरला आपला आधार लिंक्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल.
5. कॅप्चा (captcha) नोंदवा आणि निवडा की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पर्यायाचे सदस्य आहे आणि ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
6. नंतर नोंदणी प्रकिया पूर्ण करण्यासाठी बँक खात्याच्या डिटेल नोंदवा आणि पुढील प्रक्रियेचे पालन करा.
Pune Court | मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला