मोदी सरकारची नवीन योजना ! LPG गॅस कनेक्शन घेतल्यावर मिळणार 1600 रुपये, तुम्हीपण घेऊ शकता लाभ, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात १ कोटी नवीन गॅस कनेक्शन (LPG) देण्याची मोठी घोषणा केली आहे. याअनुषंगाने केंद्र सरकार आता आणखी चांगली योजना नागरिकांसाठी आणत आहे. ही गॅस जोडणी उज्ज्वला योजनेत दिली जाणार आहे. एवढच नाहीतर सरकारने या योजनेचा विस्तार करणार असल्याचंही सांगितलं आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना LPG कनेक्शन देण्यात येणार आहे.

दरम्यान, सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करते. यामध्ये शासनाने १६०० रुपये देण्याचं ठरवलं आहे. एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी केल्यानंतर हे पैसे देण्यात येतील. ह्यानंतरर इतकंच नाही तर आता स्टोव्ह खरेदी किंवा LPG सिलिंडर घेतल्यानंतर EMI देण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.

कसा कराल अर्ज-

>उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेण्यासाठी बीपीएल कुटुंबातून कोणतीही महिला अर्ज करू शकते.
>यासाठी KYC फॉर्ण भरून LPG सेंटरमध्ये जमा करावा लागणार आहे.
>यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला १४.२ किलो ग्रॅमचा सिलेंडर किंवा ५ किलो ग्रॅमचा सिलेंडर मिळेल.
>उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ फॉर्म डाऊनलोड करू शकता
>याव्यतिरिक्त तुम्ही LPG सेंटरमधूनही गॅस घेऊ शकता.

लागणारे आवश्यक कागदपत्रे-

>या योजनेचा लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड, बीपीएल रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्डची प्रत, बीपीएल यादीमध्ये एलआयसी पॉलिसी, बँक स्टेटमेंट, नेम प्रिंट आऊट अशी कागदपत्रं.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अट-

>सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
>यामध्ये अर्जदाराचं वय किमान १८वर्षे असणं महत्त्वाचं आहे.
>अर्जदार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असलं पाहिजे.
>कोणत्याही बँकेत अर्जदाराचं खातं असणं आवश्यक आहे.
>तर अर्जदाराच्या नावावर आधीपासून कोणतंही LPG गॅस कनेक्शन नसावं.

उज्ज्वला योजनेविषयी अधिक माहितीसाठी-
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या Http://www.petroleum.nic.in/sites/default/files/ वेबसाईटला भेट द्या.