खुशखबर ! पाण्याच्या बाटल्या फेकू नका, विकून कमवा पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिंगल युज प्लास्टिकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केल्यानंतर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयासह अनेक मंत्रालयांनी सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता अनेक कंपन्या या मोहिमेत सहभागी होत आहेत. 2 ऑक्टोबर रोजी सुरु होणाऱ्या या मोहिमेपूर्वी केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी कंपन्यांना या प्लॅस्टिकवर पर्याय म्हणून लवकर नवीन पर्याय तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक प्रकारच्या प्लास्टिकचा पर्याय सापडून देखील आतापर्यंत कोणतेही समाधान मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

काही उपाय नाही का ?

बाटलीबंद पाणी तयार करणाऱ्या कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या यावर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्याचबरोबर मिनरल वॉटर इंडस्ट्री हि एकूण 30 हजार कोटी रुपयांची असून दारूची देखील इंडस्ट्री जोडली तर एकूण साडेसात लाख कोटी रुपयांची हि इंडस्ट्री आहे. त्यामुळे आता सरकारपुढे मोठा प्रश्न आहे कि यावर पर्याय काय ?

बाटल्या विकून मिळवा पैसे

या अभियानात भाग घेणाऱ्या एका कंपनीने संगितले कि, त्यांनी या बाटल्या विकत घेण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छ बाटल्या 15 रुपये किलोने विकत घेतल्या जातील तर अस्वच्छ बाटल्या 10 ते 12 रुपये प्रतिकिलोने घेतल्या जातील. या कंपनीने दोन वर्षांपूर्वीच मुंबईत याची सुरुवात केली असून या बाटल्या कचऱ्यात जाण्याऐवजी पुन्हा यांचा वापर व्हावा. एवढाच यामागील उद्देश आहे. आतापर्यंत कंपनीने 5 हजार टन प्लास्टिक बाटल्या गोळा केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like