×
HomeUncategorizedModi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुळे नोकरी गमावणाऱ्या ESIC...

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुळे नोकरी गमावणाऱ्या ESIC च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 3 महिन्यांचा पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विमा महामंडळाच्या कर्मचा-यांना एक फायदा होणार आहे. कोरोना काळात नोकरी गमावणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात Employee’s State Insurance Corporation (ESIC) कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव (Union Minister Bhupendra Yadav) यांनी दिली आहे.

कोरोना काळात नोकरी गेलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळच्या कर्मचा-याच्या पगाराबाबत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी (शुक्रवारी) 1 ऑक्टोबर रोजी माहिती दिली आहे.
त्यावेळी माहिती देतान मंत्री भूपेंद्र यादव (Union Minister Bhupendra Yadav) सांगितले आहे की, कोरोनामुळे राज्य कर्मचारी विमा निगमच्या ज्या कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे
त्यांच्या वारसांना आजीवन आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्राने (Modi Government) घेतला आहे.

प्रत्येक राज्यात आता लेबर कोड तयार करण्याचं काम सुरु आहे.
देशभर नवीन कामगार कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
त्यामुळे काही राज्यांनी त्यांच्या राज्यात हा कायदा लागू केला.
कामगारांशी संबंधित विविध 29 कायद्यांचे एकत्रिकरण करुन एकच लेबर कोड तयार करण्यात येत आहे.
तसेच, देशात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरु करण्यात येत आहे.
याच धर्तीवर केंद्र सरकारकडून ‘वन नेशन वन ईएसआय कार्ड’ (ESI card) या दिशेने काम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
त्याद्वारे भविष्यात देशातील सर्व ESI कर्मचाऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असणार असल्याचं ते मंत्री यादव (Union Minister Bhupendra Yadav) म्हणाले.

 

कामगारांना e-shram या पोर्टलवर नोंदणी करता येणार –

सर्व प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. यासाठी 14433 हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे.
या पोर्टलवर जाऊन कामगारांना आपली सर्व माहिती भरावी लागेल, सोबत आपल्या आधारचा आणि बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल.
त्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड (E-labor card) देण्यात येईल.
यावरुन संघटीत असणा-या राज्यासाठी ई पोर्टल सेवा (E-portal service) सुरु केली जाणार आहे.

असंघटित क्षेत्रांतील कामगारांच्या वेगवेगळ्या 400 श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये देशातील कोणताही कामगार त्याच्या नावाची नोंद करु शकतो.
स्थलांतरित कामगार, स्ट्रीट व्हेन्डर, बांधकाम कर्मचारी, घरकाम करणारे कामगार यासहित अनेक क्षेत्रातील 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचं
आणि त्यांना केंद्राच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य असल्याचं मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Modi Government | modi government announced to assure of financial support to covid19 affected esic employees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Drug Mafia Rubina Shaikh | ड्रग माफियांचे मालेगाव कनेक्शन उघड; रुबीना शेखची २ कोटींची मालमत्ता

Indian Post Recruitment | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! टपाल विभागात 266 पदांवर भरती; जाणून घ्या

Share Market Update | सरकारी कंपन्यांमध्ये ‘बंपर’ कमाईची ‘सुवर्ण’संधी; जाणून घ्या कारण 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News