सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी ! घरगुती गॅस स्वस्त करण्यासाठी मोदी सरकार उचलू शकतं ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान उज्जवला योजनेच्या धर्तीवर आता PNG जोडल्यावर तुम्हाला सब्सिडीचा फायदा मिळू शकतो. एका वृत्तानुसार शहरी गरीब ग्राहकांना PNG जोडून घेण्यास आर्थिक मदत देण्याचा विचार केला जात आहे. यावर पेट्रोलियम मंत्रालय प्रस्ताव तयार करत आहे.

वृत्तानुसार, या योजनेअंतर्गत PNG जोडणीच्या शुल्काचा एक हिस्सा सरकार भरेल. या मॉडलमध्ये राज्यांना सहभागी करुन घेण्याची योजना आहे. पंतप्रधान उज्जवला योजनेच्या धर्तीवर योजना आणण्याचा विचार होत आहे. यासाठी गुजरात मॉडेलचा अभ्यास केला जात आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 400 जिल्ह्यांना जोडणी देण्याचे लक्ष आहे. सरकार 2030 पर्यंत ऊर्जा वापरात गॅसची हिस्सेदारी 15 टक्के करु इच्छित आहे.

सध्या पीएनजी जोडणी घेण्यासाठी ग्राहकांकडून 5 ते 6 हजार रुपये आकारण्यात येतात. पीएनजी जोडणीला आर्थिक मदत देण्यासाठी गुजरात मॉडेलचा अभ्यास केला जात आहे. गुजरात सरकारकडून गरीब शहरी कुटूंबांना पीएनजी जोडणीवर जवळपास 1600 रुपये अंशदान देण्यात येते. नीति आयोगाने देखील जोडणीची संख्या वाढवण्याची शिफारस केली आहे.

आता सीएनजीची होणार होम डिलिवरी –
सरकार आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या धर्तीवर सीएनजीची होम डिलिवरी सुरु करण्यास परवानगी देण्याचा विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मते, सरकार कंपन्यांना लवकरच सीएनजीची डिलिवरी देण्याची परवानगी देणार आहे. याआधी सरकारने डिझेलची होम डिलिवरी देण्याची सुविधा सुरु केली होती. पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले की सरकार पेट्रोल डिझेलच्या धर्तीवर सीएनजीची होम डिलिवरी देण्याची योजना तयार करत आहे. यावर काम सुरु झाले आहे. लवकरच कंपनींना परवानगी देण्यात येईल. सरकारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिडेट सीएनजीची होम डिलिवरी देईल.

एका कॉलवर मिळेल सुविधा –
पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले की घर बसल्या सीएनजी मागवून घेण्याची सुविधा एका कॉलवर उपलब्ध होईल. मोबाइल डिस्पेंसरच्या माध्यमातून लोकांना डोर स्टेप सीएनजी उपलब्ध करुन दिला जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/