महिन्याला भरा २८.५० रुपये आणि मिळवा ४ लाखाचा विमा ; सरकारच्या ‘या’ योजनेचा ‘असा’ घ्या फायदा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मोदी सरकारनं जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून विविध योजना पुढे आणल्या आहेत. त्यात जनतेला सुरक्षा कवच देण्यासाठी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) सुरु केल्या होत्या. या योजनेत एकूण 4 लाख रुपयांचं विमा कव्हर मिळतं, तेही दर वर्षी फक्त 342 रुपये प्रीमियरवर. म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला 28.50 रुपयांच्या खर्चावर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत तुम्हाला 55 वर्षांपर्यंत लाइफ कव्हर मिळेल. कोणत्याही कारणानं विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नाॅमिनीला 2 लाख रुपये लाइफ कव्हर मिळेल. 18 ते 50 वर्षापर्यंतची व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमध्ये वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. म्हणजे दर महिन्याला 27.5 रुपये खर्चावर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्त्व आलं तर 2 लाख रुपयांचा विमा मिळू शकतो. कायमस्वरूपी थोडं अपंगत्त्व आलं तर 1 लाख रुपयांचं कव्हरेज मिळू शकतं. 18 ते 70 वर्षापर्यंतचा भारतीय याचा लाभ घेऊ शकतो. याचा वर्षाला प्रीमियम 12 रुपये आहे. दर महिना फक्त 1 रुपया भरावा लागतो.

दोन्ही योजनांचा मिळून महिन्याला 28.50 रुपये खर्च

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना मिळून 4 लाख रुपये विमा मिळू शकतो. कुणाला या दोन्ही योजनांचा फायदा हवा असेल तर दोन्ही योजनांचा प्रीमियम मिळून 342 रुपये वर्षाला आणि 28.50 रुपये दर महिन्याला खर्च येईल.

मेमध्ये द्यावा लागतो प्रीमियम

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम मे महिन्याच्या शेवटी द्यावा लागतो. PMJJBY चा वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे तर PMSBY चा वार्षिक प्रीमियम 12 रुपये आहे. दोन इन्शुरन्सचा एकूण प्रीमियम वर्षाला 342 रुपये आहे. मेच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यात पैसे नाही भरले तर तुमचा इन्शुरन्स रद्द होऊ शकतो.

असं करायचं रजिस्ट्रेशन ?

या दोन्ही योजनांच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊ शकता. किंवा विमा एजंटशी संपर्क करू शकता.सरकारी विमा कंपनी आणि खासगी विमा कंपनी बँकांसोबत या नव्या योजना घेऊन येतायत. अधिक माहितीसाठी तुम्ही www.jansuraksha.gov.in आणि www.financialservices.gov.in या वेबसाइटवर पाहू शकता.