Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून (Modi Government Schemes)अनेक वर्गासाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांद्वारे कोट्यवधी लोकांना लाभ मिळत असल्याचा दावा मोदी सरकारकडून (Modi Government Schemes) केला जात आहे. सरकारने विमा देण्यासह उद्योग सुरू करणार्‍या लोकांसाठी मुद्रा लोनची सुद्धा व्यवस्था केली आहे. केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांबाबत जाणून घेवूयात…

1 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) 

10.34 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंदणी झाली. यामध्ये नागरिकांना एक विशेष विमा दिला जातो. यामध्ये कोणत्याही कारणामुळे विमित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतात.

2 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) –

23.40 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी नोंदणीकृत झाले. ही एक व्यक्तिगत दुर्घटना विमा योजना आहे. दुर्घटनेत मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास सुरक्षा देते. दरवर्षी 12 रुपये भरावे लागतात.

3 अटल पेन्शन योजना (atal pension yojana) –

3.10 कोटी लाभार्थी नोंदणीकृत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये दरमहिना एक ठराविक योगदान केल्यास निवृत्तीनंतर 1 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते.

Modi Government Schemes | central government schemes know about government schemes including mudra yojana to atal pension yojana check here all details

4 जन औषधी केंद्र (jan aushadhi kendra)-

देशात 7900 पेक्ष जास्त जन औषधी केंद्र उभारली, ज्यामध्ये अनेक लोकांना फायदा झाल्याचा दावा केला जात आहे. हे एक प्रकारचे मेडिकल स्टोअर आहे, जिथे लोक स्वस्तात औषधे खरेदी करू शकता.

5 प्रधानमंत्री जन आरोग्य योजना pradhanmantri jan arogya yojana (आयुष्मान भारत- ayushman bharat yojana) –

1.91 कोटीपेक्षा जास्त लोकांनी यासाठी नोंदणी केली. या योजनेत हॉस्पिटलमध्ये 5 लाखापर्यंतच्या उपचारासाठी विमा दिला जातो.

6 भारतनेट (bharatnet scheme) –

देशातील 1.73 लाखापेक्षा जास्त ग्राम पंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आले. भारतनेट
योजना भारतातील 2.5 लाख ग्राम पंचायतींनस ब्रॉडबँड कनेक्टिव्हिंटीत आणण्याचा कार्यक्रम आहे.

7 सॉइल हेल्थ कार्ड (soil health card scheme) –

या योजनेत 22.87 कोटीपेक्षा जास्त सॉइल हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले. मृदा आरोग्य कार्ड
योजनेंतर्गत शेतकर्‍यांना जे कार्ड दिले जाते त्यामध्ये शेतातील माती कोणत्या प्रकारची आहे, याची
माहिती मिळते. यातून शेतकरी चांगले पीक घेऊ शकतो.

8 जल जीवन मिशन (jal jeevan mission) –

या मिशनमध्ये 7.75 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे शुद्धा पाणी पोहचवण्याचा दावा करण्यात येत
आहे. योजनेचा उद्देश्य प्रत्येक ग्रामीण घरात 2024 पर्यंत नळाचे पाणी उपलब्ध करून देणे आहे.

9 प्रधानमंत्री स्वनिधी योजना (pradhanmantri svanidhi yojana) –

25.05 लाखापेक्षा जास्त रस्त्यावरील विक्रत्यांसाठी 10-10 हजार रुपयांचे मदत कर्ज स्वीकृत
करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. या योजनेत 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

10 प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) pradhanmantri awas yojna –

शहरातील गरीबांसाठी 1.12 कोटीपेक्षा जास्त स्वस्त घरे स्वीकृत करण्यात आली. या योजनेंतर्गत घर बनवण्यासाठी सरकारकडून सबसिडी दिली जाते.

11 मुद्रा योजना (mudra yojana)-

मुद्रा योजनेंतर्गत त्या व्यक्तींना कर्ज दिले जात आहे, ज्यांना स्वतःचा व्यापार सुरू करायचा आहे.

12 स्टार्टअप इंडिया (startup india scheme) –

स्टार्टअप इंडिया सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याद्वारे नवीन स्टार्टअपला बिझनेससाठी मदत दिली जात आहे.

हे देखील वाचा

Changes From 1st August | 1 ऑगस्टपासून बदलतील दैनंदिन जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम, तुमच्यावर होईल थेट परिणाम, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Modi Government Schemes | central government schemes know about government schemes including mudra yojana to atal pension yojana check here all details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update