Modi Govt | मोदी सरकारसाठी तीन दिवसांत एका पाठोपाठ एक ३ गुड न्यूज; तरुणांसाठी आनंदवार्ता

नवी दिल्ली : Modi Govt | महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावर बॅकफूटवर गेलेल्या मोदी सरकारसाठी एका पाठोपाठ एक ३ गुड न्यूज आणि तरूणांसाठीसाठी आनंदवार्ता आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारी दरात घट, जीएसटी संकलनात वाढ आणि अर्थव्यवस्था वाढीचा दर कायम असल्याचे म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारसाठी ही आशादायी स्थिती असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. (Modi Govt)

सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकड्यांनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये भारतातील बेरोजगारीचे प्रमाण ८.१० टक्के होते. ते सप्टेंबरमध्ये ७.०९ टक्क्यांवर आले आहे. या महिन्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे. ऑगस्टमध्ये ७.११ टक्क्यांवर असलेले प्रमाण सप्टेंबरमध्ये ६.२० टक्क्यांवर आले आहे. (Modi Govt)

तर शहरातील बेरोजगारीचा दर १०.०९ टक्क्यांवरुन ८.९४ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच भारतातील बेरोजगारीचा दर मागील वर्षभरातील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्टच्या तुलनेत यात १ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.

अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर २०२३ मधील जीएसटी संकलनाचे आकडे प्रसिद्ध केले.
देशाच्या जीएसटी संकलनात वार्षिक १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारला १.६२ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
ही मोदी सरकारसाठी गुडन्यूज म्हणावी लागेल.

जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच इतर जागतिक संस्था, इत्यादींनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत
सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्के वेगाने वाढेल असा अंदाज आहे.
जगाची अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारतासाठी ही चांगली बातमी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना