Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन

पोलीसनामा ऑनलाइन – Modi Govt On Ujjwala Yojana | सामान्य लोकांना एलपीजी गॅस स्वस्त झाल्यामुळे महागाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारकडून घरगुती एलपीजी गॅस दोनशे रुपयांनी स्वस्त करत खुशखबर देण्यात आली होती. आता गॅस सिलेंडरच्या बाबतीत केंद्र सरकारकडून आणखी एक खुशखबर देण्यात आली आहे. लवकरच मोदी सरकार उज्ज्वला योजनेचा विस्तार करणार असून या अंतर्गत आणखी 75 लाख गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. (Modi Govt On Ujjwala Yojana)

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांचे G20 शिखर परिषद यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव मांडला. आज भारत जागतिक अजेंडा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि त्याचे श्रेय देशाच्या नेतृत्वाला जाते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. “पहिला निर्णय, पुढील 3 वर्षांत 2026 पर्यंत 75 लाखाहून अधिक एलपीजी कनेक्शन मोफत दिले जातील. उज्ज्वला योजनेचा हा विस्तार आहे. या योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांसाठी गॅस कनेक्शन दिले जातील, ज्यामध्ये पहिले रिफिल मोफत असेल, त्याचा खर्च तेल कंपनी उचलेल.” अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. (Modi Govt On Ujjwala Yojana)

अनुराग ठाकूर यांनी झालेल्या दुसऱ्या निर्णयाबाबतही सांगितले.
ते म्हणाले की, “मंत्रिमंडळाचा दुसरा निर्णय म्हणजे 7,220 कोटी रुपयांच्या ई-कोर्ट मिशन मोड प्रोजेक्ट फेज 3 ला
मान्यता देण्यात आली आहे. ऑनलाइन आणि पेपरलेस न्यायालये स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.
यामुळे न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक होईल, पेपरलेस न्यायालयांसाठी, ई-फायलिंग आणि ई-पेमेंट प्रणाली सार्वत्रिक
केली जाईल. डेटा साठवण्यासाठी क्लाउड स्टोरेज तयार केले जाईल. सर्व न्यायालयीन संकुलात 4,400 ई-सेवा केंद्रे
उभारली जातील.” असे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एलपीजी गॅस
संदर्भात घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे महिला वर्ग आनंदी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ