Health Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनो व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे (Second wave of corona) देशाची अर्थव्यवस्था अतिशय वाईट प्रकारे प्रभावित झाली आहे. या दरम्यान, सरकारी सूत्रांच्या संदर्भाने वृत्त आले आहे की, केंद्र सरकार  (Central Government) महामारीने प्रभावित आरोग्य देखरेखीच्या पायाभूत सुविधांना (health infrastructure ) प्रोत्साहन देण्यासाठी 6.8 बिलियन डॉलर (50,000 कोटी) चे लोन प्रोत्साहन सादर करण्याच्या विचारात आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

RBI ने केली होती 50,000 कोटी लोन देण्याची घोषणा

लाइव्ह मिंट सूत्रांच्या संदर्भाने म्हटले आहे की, या प्रोत्साहन रक्कमेतून कंपन्यांना हॉस्पिटलची क्षमता किंवा वैद्यकीय पुरवठा वाढवण्यास मदत मिळेल.
सरकार यामध्ये एका गॅरंटरच्या रूपात काम करेल.
सूत्रांनी सांगितले की, छोट्या शहरात कोविड-19 शी संबंधीत आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे (health infrastructure ) बळकटीकरण करण्याकडे लक्ष देण्याची शक्यता आहे.
सध्या अर्थ मंत्रालयाच्या (Ministry of Finance) प्रवक्त्याने याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
अलिकडेच आरबीआय गव्हर्नरने (RBI Governor) म्हटले की, कोरोना संकट पाहता इमर्जन्सी हेल्थ सेवांसाठी 50000 कोटींच्या लोनची घोषणा केली होती.

41 बिलियन आपत्कालीन कर्जाची घोषणा

सरकारने मागील महिन्यात सुद्धा वेगळी घोषणा केली होती.
ज्यामध्ये एयरलाइन आणि हॉस्पिटल्सना महामारीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी 41 बिलियनच्या आपत्कालीन कर्जाचा कार्यक्रमात सहभागी केले होते.
हा कार्यक्रम हॉस्पिटल आणि क्लिनिक यांना ऑन-साईट ऑक्सीजन उत्पादन संयंत्र स्थापन करण्यासाठी 20 मिलियन रुपयांच्या कर्जाची गॅरंटी देतो, ज्यामध्ये व्याजदर 7.5% आहे.

 

Web Title : modi govt plans 50000k crore credit incentives to boost health infrastructure varpat

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Modi Cabinet Expansion | मोदींच्या मंत्रिमंडळातून राज्यातील 2 मंत्र्यांना डच्चू? ‘या’ दोघांना मिळणार संधी