महाराष्ट्र कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने केले पंतप्रधानांचे कौतुक, म्हणाले – ‘मोदी है तो मुमकिन है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) मंगळवारी (दि. 8) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची भेट घेत आहेत. या भेटीत राज्याशी संबधित अनेक विषयावर चर्चा होणार आहे. मात्र, मराठा आरक्षण हा या भेटीतील सर्वात प्रमुख मुद्दा आहे. तोच धागा पकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करणारे (congress) काँग्रेसचे (congress) प्रवक्ते सचिन सावंत ( Sachin Sawant) यांनी एक ट्विट करून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. मोदी है तो मुमकिन है असे सावंत यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.

दिल्लीत उद्धव-मोदींमध्ये खलबतं, राज्यात भाजपने बोलवली तातडीची बैठक, फडणवीस यांच्या बंगल्यावर हालचालींना वेग

 

‘चोरीचा माल विकत घेणं सुद्धा गुन्हा’ ! अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांनी दिलं उत्तर

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. 102 वी घटनादुरुस्ती आणि इंदिरा सहानी प्रकरणातील 50 टक्के आरक्षणाची मर्यादा या मुद्द्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आता पूर्णपणे केंद्राच्या आधीन आहे.
संसदेत कायदा करून हा प्रश्न निकाली काढला जाऊ शकतो.
महाविकास आघाडीचे नेते भेटल्यावर मोदीजी निश्चित निर्णय घेतील,
असा विश्वास काँग्रेसचे (congress) प्रवक्ते सावंत यांनी व्यक्त केला आहे.
मोदी है तो मुमकिन है असेही त्यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.
केंद्राने कायदा केल्यास मराठा आरक्षणावर तोडगा निघू शकतो.
अशी महाविकास आघाडीची सुरुवातीपासूनचीच भूमिका आहे.
तीच भूमिका आज पंतप्रधान मोदी यांच्याकडे मांडली जाण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर सावंतांनी केलेल ट्विट महत्वाच मानले जात आहे.

खासदार नवनीत राणांना मोठा झटका, मुंबई HC कडून जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

Coronavirus : ‘कोविड’ बरा झाल्यानंतर लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसल्यास तात्काळ सावध व्हा, अन्यथा फेल होऊ शकतात ‘ऑर्गन’