वर्ल्डकप २०१९ : संघात स्थान न दिल्याने ‘तो’ ढसाढसा रडला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत अफगाणिस्तानने खेळलेल्या तिन्ही पराभव स्वीकारला आहे, त्यामुळे गटायचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. मात्र या संघाची कामगिरी एकीकडे सुमार होत असताना संघाबाहेर एक विचित्र घटना घडली आहे. अफगाणिस्तानचा सलामीचा खेळाडू आणि यष्टिरक्षक मोहमंद शहजाद याने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत.

आपण फिट असताना देखील बोर्डाने आपल्याला या स्पर्धेतून बाहेर काढले असा आरोप त्याने केला आहे. माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा देखील आरोप त्याने यावेळी केला. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने हि माहिती दिली. याविषयी अधिक बोलताना तो म्हणाला कि, मी नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना टीम मॅनेजरने मला बोलावून घेतले आणि सांगितले कि, तू फिट नाहीस तुला घरी जावे लागेल, मात्र जर मी अनफिट असतो तर मी इंग्लंडला कसं काय आलो असतो ? त्यामुळे माझ्याविरुद्ध षडयंत्र रचून मला संघाबाहेर काढण्यात आले. यावेळी तो मोठयामोठ्याने रडला देखील. त्यामुळे त्याला या गोष्टीचे किती दुःख झाले आहे, हे त्याच्या कृतीतून जाणवत होते.

दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शहजादने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून आता यावर काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शहजादने या वर्ल्डकपमध्ये एकूण दोन सामने खेळले आहेत आणि त्यात त्याला फक्त सात धावा करण्यात यश आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

देहूत महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर तपासणी

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी