Mohan Joshi On Pune Metro | गेल्या 2400 दिवसांमध्ये पुणे मेट्रो किती इंच पुढे सरकली? मोहन जोशींचा संतप्त सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mohan Joshi On Pune Metro | पुण्याची मेट्रो हे पुणेकरांचे स्वप्न असले तरी आता पूर्ण मेट्रो सुरु होण्यासाठी अजून किती वर्षे अथवा दशके थांबावे लागेल? कारण आता पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल रुग्णालय दरम्यानच्या एकूण १२ किलोमीटरच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन १५ जुलै रोजी होणार होते. त्याचे काय झाले? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी केला आहे. (Mohan Joshi On Pune Metro)

मोहन जोशी म्हणाले की, २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भूमीपूजन आणि निवडणुका
डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने अवघ्या ५ किलोमीटर मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)
६ मार्च २०२२ रोजी केलेले उद्घाटन म्हणजे निव्वळ धूळफेक होती. पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन होऊन आज २४००
दिवस होऊन गेले आहेत. या काळात अवघे ५ किलोमीटर मेट्रो मार्ग तयार झाले. आता पुढचे सुमारे २९-३० कि.मी. लांबीचे
मेट्रो मार्ग पुरे होण्यास यापुढे किती वर्षे अथवा दशके लागतील हे भाजपाने जाहीर करावे. (Mohan Joshi On Pune Metro)

ते म्हणाले की, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोबाबत असंख्य वायदे केले.
यावर्षी तर दर महिना ते वायदा करीत आहे. या वर्षी जानेवारी, नंतर मार्च, नंतर 1 मे, त्यानंतर जून आणि १५ जुलै असे
वायदे त्यांनी केले. तरी मेट्रो काही केल्या पुढे सरकत नाही. याचे नक्की गौडबंगाल काय आहे?
पुणे मेट्रो प्रकल्प का रखडत आहे? या बाबत पालकमंत्र्यांनी पुणेकरांना उत्तर द्यायलाच हवे असे ते म्हणाले.

Pune Police News | ‘महिलांसोबत गैरकृत्य करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करणार’, महिला-मुलींना सुरक्षिततेचे धडे देण्यासाठी ACP अश्विनी राख उतरल्या रस्त्यावर