Molestation Case | विनयभंगाच्या कलमाखाली आरोपी महिलेला दोषी ठरविण्याचा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Molestation Case | एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली दुसऱ्या महिलेला विनयभंगाच्या कलमांतर्गत मुंबईतील माझगाव न्यायालयाने दोषी ठरवत सहा हजार रूपये दंड आणि वर्षभराच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दोन महिलांच्या भांडणात एका महिलेने दुसऱ्या महिलेचे कपडे फाडले होते. या गुन्ह्यात महिलेला दोषी ठरवले आहे.

 

विनयभंगाच्या कलमाखाली फक्त पुरूषच दोषी असतात, असा जनमानसात समज असतो. पण पुरूषांप्रमाणे एका महिलेकडून देखील दुसऱ्या महिलेचा विनयभंग केला जाऊ शकतो. तो करण्यासाठी बळाचा वापर केला जाऊ शकतो. तिला मारहाण केली जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकरणात आरोपी महिला विनयभंगाच्या कलमाखाली दोषी ठरविली जाऊ शकते, असे महत्वपूर्ण निरीक्षण माझगाव न्यायालयाने दिले आहे. (Molestation Case)

 

आरोपी आणि तक्रारदार महिलेच्या कुटुंबात गेली दोन वर्षे वाद सुरू होते. त्यानंतर झालेल्या भांडणात आरोपी महिलेने तक्रारदार महिलेला चपलीने मारहाण केली. त्यांच्या भांडणात उपस्थितांनी हस्तक्षेप केल्यावर आरोपी महिलेने तक्रारदार महिलेचा गळा पकडून तिला शिवीगाळ करून तिचे कपडे फाडले. त्यानुसार तक्रारदार महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यामुळे तक्रारदार महिलेचे कपडे फाडून विनयभंग केला आणि तिच्या सार्वजनिक जगण्याच्या अधिकाराचा देखील भंग केला अशी तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली. आरोपी महिलेने आपल्या पतीला तक्रारदार महिलेवर बलात्कार करण्यास देखील सांगितले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

माझगाव न्यायालयाचे दंडाधिकारी एम. व्ही. चव्हाण यांच्यापुढे या प्रकरणावर सुनावणी झाली.
यावेळी न्यायमूर्तींनी म्हंटले, पुरूषाप्रमाणेच एखाद्या महिलेकडून देखील दुसऱ्या महिलेवर विनयभंग करण्याच्या हेतूने बळाचा वापर करून,
तिला मारहाण करुन विनयभंग करण्यात येत असेल, तर अशा प्रकरणात महिलेला विनयभंगाच्या आरोपांतर्गत दोषी ठरवता येऊ शकते.
एखाद्या स्त्रीला आरोपांतून वगळण्यात यावे, असे कायद्यात कुठेही नमूद नाही.
त्यामुळे या प्रकरणात आरोपी महिलेला विनयभंगाच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले आहे. (Molestation Case)

 

Web Title :- Molestation Case | mumbai magistrate court convict female under section of molestation impose one year jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

Ajit Pawar – Raj Thackeray | आम्ही दोघे ‘ओठात एक आणि पोटात एक’ असे बोलत नाही; अजित पवार राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल