शाळकरी मुलीचा विनयभंग 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन- शाळकरी मुलीचा पाठलाग करुन, धमकी देऊन विनयभंगचा प्रकार केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी सहा वाजता रहाटणी येथे घडला.

याप्रकरणी विकास कांबळे (वय 20, रा. पिंपळेसौदागर) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी गुरूवारी सायंकाळी शाळेतून घरी येत होती. कुंजीर मंदिरासमोर विकासने त्या मुलीचा हात धरला. तू माझ्याशी बोलली नाही तर तुझ्याकडे बघून घेईन अशी धमकी देत आरोपीने तिला शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच मोटारीने तिचा पाठलाग केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.