अभिमानास्पद ! नितीन गडकरींनी १ रुपयाही न घेता बनवले ६५ हजार कि.मी. लांबीचे ‘हाय-वे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारतमाला प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात ६५ हजार किलोमीटर लांबीचे नॅशनल हायवे बनवण्यात आले. तर २०२२ पर्यंत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ३४८०० किलोमीटर हायवे बनवण्यात येतील. या सर्व प्रोजेक्टला जवळपास १० लाख करोड रुपये लागू शकतात.

गडकरी यांनी सांगितले की, प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात आम्ही वित्त मंत्रालयाकडून एक रुपयाची देखील मदत घेतली नाही. त्यासाठी लागणारे संपूर्ण भांडवल बाजारातून उभे केले असून आम्ही टीओटी मॉडल बनवत आहेत असे गडकरी म्हणाले.

जमीन आधिग्रहणाची समस्या –

गडकरी म्हणाले की, राज्य सरकारने रस्ते प्रकल्पात येणाऱ्या जमीन आधिग्रहणासाठीचा पैसा उभा करावा. केरळ मध्ये जमीन आधिग्रहणाची मोठी समस्या आहे. कारण जमीन आधिग्रहणाची किंमत अधिक आहे. मात्र जमीन अधिग्रहणामुळे कोणत्याही प्रकल्पात जास्त वेळ लागला नाही. हे सरकारचे मोठे यश आहे. निर्माणसंबंधित डीपीआर हे जास्त कालावधी लागण्याचे कारण असून डीपीआर सिस्टीम मध्ये ड्रोनच्या मदतीने इनोवेशन आणण्याचा प्रयत्न केला आहे. असे गडकरी म्हणाले.

२०१७ ला मिळाली भारतमाला प्रोजेक्टला मिळाली मंजूरी –

भारतमाला प्रोजेक्टला पहिल्या टप्प्यात २०१७ मध्ये मंजूरी देण्यात आली. याच बरोबर २४,८०० किलोमीटर नॅशनल हायवे बनवण्याचे काम देण्यात आले होते. एवढेच नाही तर १० हजार किलोमीटर बॅलेन्स रोडचे काम देखील नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत देण्यात आले आहे. ज्याचे ८००० किलोमीटरचे काम पुर्ण करण्यात आले आहे.

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट