खुशखबर ! आता थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करणार सरकार विजेच्या सबसिडीचे पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्व ग्राहकांना व्यवस्थित वीज मिळावी यासाठी वीज मंत्रालयाने एक नवीन टेरिफ योजना आणली आहे. या योजनेला सर्व मंत्रालयाकडे मंजुरीसाठी देण्यात आले असून यावर एका आठवड्याच्या आत निर्णय होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना सबसिडी देण्याची योजना

मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन टेरिफ योजनेत विजेवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. या नवीन योजनेत थेट ग्राहकांच्या खात्यात या योजनेचे पैसे देण्याचा सरकारचा विचार सुरु असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी प्रत्येक राज्यातील विभागांना त्यांच्या राज्यातील वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका वारसाच्या आतमध्ये सर्व राज्यांना हि माहिती केंद्र सरकारला द्यायची आहे.

प्रत्येक घरात स्मार्ट मीटर

त्याचबरोबर या नवीन योजनेत प्रत्येक घरी विजेचे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असून यामद्ये ग्राहकांना हप्त्यावर देखील हे स्मार्ट मीटर देण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षात हे स्मार्ट मीटर प्रत्येक घरात बसवण्यात येणार आहेत.

बिल भरणाऱ्या ग्राहकांवर बोझा नाही

या नवीन योजनेत वीज बिलांमध्ये देखील बदल केले जाणार आहेत. यामध्ये आता फक्त तुम्ही वापरलेल्या युनिटचे पैसे द्यायचे आहेत. यापूर्वी यामध्ये अनेक विविध कर तसेच वाहक चार्जेस लावण्यात यते असत. यामुळे आता नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर यापुढे बोझा पडणार नाही.

ग्राहकांना मिळणार भरपाई

जात वीज वितरण विभागाकडून ग्राहकांना २४ तासाच्या आत वीज उपलब्ध करून देण्याचे प्रावधान या नवीन योजनेत करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा कोणताही त्रास झाल्यास वीज कंपनीला याची ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे.

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?