खुशखबर ! ‘इफको’चा 5 कोटी शेतकऱ्यांना दिलासा, खतांच्या किमतींमध्ये प्रति पोते 50 रुपयांची कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर कोऑपरेटिव म्हणजेच इफकोने गुरुवारी स्वातंत्र दिनाच्या पार्श्ववभूमीवर भारतीय शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून खतांच्या किमतींमध्ये ५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. इफकोच्या या घोषणेचा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

संपूर्ण देशात मिळणार सूट 
इफकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यूएस अवस्थी यांनी चेन्नईमधील आपल्या प्रमुख कार्यालयात झेंडावंदनावेळी याची घोषणा केली. या घोषणेची अंमलबजावणी तात्काळ करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. त्यांनी यावेळी म्हटले की, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नाला मदत मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा मिळणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट 
त्यांनी ट्विट करत म्हटले की, मला हि घोषणा करताना आनंद होत आहे की, सर्व खतांच्या किमतींमध्ये ५० रुपयांची कपात करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊन त्यांना भांडवल देखील कमी लागणार आहे. इफको संपूर्ण भारतात ३५ हजार समितीच्या माध्यमातून ५ करोड शेतकऱ्यांना सेवा प्रदान करत आहे.

१२५० रुपये झाली खतांची किंमत 
या कपातीमुळे खतांच्या किमतीत ५० रुपये कमी होणार असून डीएपी खताच्या पोत्याची किंमत १२५० रुपये झाली आहे. तर एनपीके-१ ची किंमत १२५० वरून १२०० रुपये झाली आहे. एनपी खताच्या किंमती १००० रुपयांवरून ९५० रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like