आजपासून ‘Paytm’ वापरणं पडणार महाग, ‘हा’ कर वाढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या या सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या जमान्यात अनेक जण ऑनलाईन व्यवहार करताना दिसून येतात. बाजारात देखील ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी अनेक कंपन्या उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या ऍपद्वारे आपण ऑनलाईन व्यवहार करू शकतो. मात्र आता ऑनलाईन व्यवहारांसाठी पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना कंपनीने झटका दिला आहे. १ जुलै म्हणजेच आजपासून पेटीएमने मर्चंट डिस्काउंट रेट मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याचा बोझा थेट ग्राहकांवर पडणार आहे.

बँक आणि ऑनलाईन सुविधा देणाऱ्या कंपन्या या प्रत्येक व्यवहारामागे MDR घेत असतात. त्यामुळे जास्त नफा मिळवण्यासाठी पेटीएमने यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे. यामुळे यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface) या सुविधेसाठी यापुढे तुम्हाला १२ ते १५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत या सुविधेसाठी कंपनी स्वत: पैसे मोजत होती. मात्र आता यापुढे ग्राहकांना याचा भुर्दंड बसणार आहे.

आजपासून नवीन दार लागू

आजपासून तुम्हाला या सुविधेसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कोणत्याही प्रकारची सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. प्रत्येक व्यवहारासाठी आगोदर किंमत मोजावी लागायची, मात्र आजपासून ती किंमत ग्राहकांना मोजवी लागणार आहे.

MDR म्हणजे काय

मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR याचा अर्थ असा आहे कि, व्यवहार करताना दुकानदारांकडून डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवर व्यवहार केल्यास ग्राहकांकडून जी विशिष्ट रक्कम घेतली जाते. त्याला म्हटले जाते. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यानंतर मर्चंट डिस्काउंट रेट हा तीन भागांमध्ये विभागला जातो. सर्वात मोठा हिस्सा हा ज्या कपंनीचे कार्ड आहे त्यांना जातो, तर दुसरा हिस्सा हा दुकानदार ज्या कंपनीचे मशीन वापरत आहे त्या कंपनीला मिळतो. तर सर्वात शेवटी तिसरा हिस्सा हा पेमेंट कंपनीला मिळत असतो.

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी