Amazon’ सुरु करणार ‘ऑफलाइन’ रिटेल ‘स्टोअर्स’, देशभरात 2,100 स्टोअर्समधून होणार वस्तूंची ‘विक्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ई कॉमर्स कंपनी अमेझॉन लवकर भारतात ऑफलाइन रिटेल स्टोअर्स सुरु करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ग्राहकांना अमेझॉनचे फिजिकल स्टोर्स वरुन देखील वस्तू खरेदी करता येतील. ग्राहकांच्या सुविधेसाठी अमेझॉनने हा निर्णय घेतला आहे. कंपनी या माध्यमातून रिलायन्स आणि फ्लिपकार्टला टक्कर देऊ इच्छित आहे. रिलायन्सचे देशभरात सध्या रिटेल स्टोअर्स आहेत आणि फिल्पकार्ट देखील ऑफलाइन व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. 

 
2100 पेक्षा अधिक स्टोअर्स –
अमेझॉन यासाठी देशात तीन रिटेल चेन व्यवसायिकांशी चर्चा करत आहे. यात फ्यूचर ग्रुप, मोर बाजार, शॉपर्स स्टॉप यांच्या समावेश आहे. कंपनी यांच्यासोबत इंडियन ऑनलाइन प्लेटफॉर्मवर असलेले अमेझॉनचे प्रोडक्ट्स विकेल. अमेझॉन देशात 2,100 पेक्षा जास्त स्टोअर्स सुरु करण्याच्या विचारात आहे. कंपनी त्यासाठी तीन कंपन्याबरोबर भागीदारी केली आहे. सुरुवातीला अमेझॉन या स्टोअर्समध्ये स्वत:च्या वस्तू विकेल. यानंतर इतर ब्राँडच्या वस्तू देखील विक्रीस ठेवण्यात येतील.
 
 या वस्तू विकणार –
अमेझॉन आपल्या सर्वात जास्त विकल्या जाणााऱ्या प्रायवेट ब्राँड्समधील एक असलेल्या अमेझॉन बेसिक्सला जागतिक बाजारात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू इच्छित आहेत. अमेझॉनबेसिक्स ब्राँडमध्ये एअर कंडीशनर, वँक्यूम क्लीनर्स, एचडीएमआय केबल, बँटरी तसेच बेडशीट, टॉवेल, डिनर प्लेट, कटलरीसारख्या घरगुती वस्तू यांच्या समावेश आहे.  
 
अमेझॉनचा स्वत:च्या ब्राँडचे कपडे विकण्याचा विचार –
याशिवाय अमेझॉनचे दोन खासगी कपड्याचे ब्राँड देखील आहेत. यात Prowl, Just F समावेश आहे. ज्यांना अमेझॉन शॉपर्स स्टॉपच्या आउटलेटच्या माध्यमातून विकतील.