तेल, सुकामेवा आणि डाळींच्या दरात वाढ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सण म्हणजे देशाच्या सांस्कृतिचे प्रतिक आहे. घरात सणसुद असल्यावर खाद्यपदार्थांमध्ये तेल, साखर, डाळी, आणि सुखा मेवा लागणे सहाजिक आहे. पुढच्या महिन्यात रक्षाबंधन आहे, आणि त्यानंतर गणपती दिवाळी असे सण एका पाठोपाठ येणार आहेत. मात्र इकोनॉमिक टाइम्सने सणासुदीच्या दिवसात या खाद्यपदार्थांची किंमत ५-१५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षात तेलाच्या किंमतीत २-८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हारभऱा तसंत इतर डाळींची किंमत ५ टक्क्यांनी आणि ड्राय फ्रुट्सची किमत १५ टक्क्यांनी वाढू शकते. उत्पादक आणि विक्रत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या साखरेचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे त्याच्या किंमती तशाच राहु शकतात.

इंडस्ट्री एक्सपर्टच्या अहवालानुसार १५ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. याच सणापासून बाजारात खाद्यपदार्थांची अधिक मागणी केली जाते. त्यामुळे ही वाढ होणे शक्य आहे. सोयाबीन तेल सध्याच्या किमतींपेक्षा ३ टक्क्यांनी वाढणार आहे. सुर्यफूलाचे तेल ५-८ टक्क्यांनी वाढणार आहे. तर पाम ऑईल १-२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. हे झाले तेलांचे पण, ड्राय फ्रुट्समध्ये बदामाच्या किंमतीत १० टक्क्यांनी तर अकरोडच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या पदार्थांवर इम्पोर्ट ड्यूटीमध्ये वाढ केली होती. त्यामुळे भारतातील बाजारात बदामाची आवक कमी झाली. त्यामुळे सध्या बाजारात बदाम कमी प्रमाणात शिल्लक आहेत.

जेवणानंतर थोडासा गुळ खा, होतात ‘हे’ ५ मोठे फायदे, जाणून घ्या

थंड वातावरणात काही दिवस ‘या’ १४ पदार्थांपैकी काही एक खाल्ल्यास शरीराला मिळेल बळ

जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा

योग्य प्रमाणात चहा घेतल्याचे ‘हे’ २० उपयोग जाणून घ्या, यामुळे प्रत्येकाला आवडेल हे पेय