Monalisa Dance Video : ‘आओ हुजूर’ गाण्यावर मोनालिसानं केला मोहक डान्स ! प्रचंड व्हायरल झाला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही अ‍ॅक्ट्रेस मोनालिसा (Monalisa) बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती बोल्ड बिकिनीत दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं सोशलवर अटेंशन घेतलं आहे.

मोनालिसानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोनालिसा यात आओ हुजूर तुमको या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर मोनालिसानं ग्रे कलरचा लेहंगा आणि ब्लॅक चोळी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

मोनालिसाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांना तिचा डान्स आणि लुकही खूप आवडला आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचंही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मनी है तो हनी है, सरकार राज, गंगा पुत्र, काफिला असे तिचे काही बॉलिवूड सिनेमे सांगता येतील. मोनालिसा बिग बॉस 10 मध्ये झळकली होती. मोनालिसानं हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा अनेक भाषेतील सिनेमात काम केलं आहे. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.