‘रेड’ स्विमसूटमध्ये फोटो शेअर करत मोनालिसा कोणाला म्हणाली, ‘रोज माझ्यावर प्रेम कर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी स्टार आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा नेहमीच आपल्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. नुकताच सर्वांनी वॅलेंटाईन डे साजरा केला आहे. मोनालिसानंही पती कुंवर विक्रांत सिंहसोबत एक हॉट फोटो शेअर करत वॅलेंटाईन डे साजरा केला होता. मोनालिसानं कॅफ्शनही कमाल दिलं होत. मोनालिसाचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

मोनालिसानं इंस्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये मोनालिसा म्हणते, “हॅप्पी वॅलेंटाईन डे माझ्या लव. रोज माझ्यावर प्रेम कर.” मोनालिसा या फोटोत रेड स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिचा पती कुंवर विक्रांत हा देखील या फोटो शर्टलेस दिसत आहे. मोनानं आपल्या हॉट फोटोनं आणि लवली कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोनालिसाचे फोटो व्हायरल होण्याची तशीही ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे बिकीनीतले अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत.

मोनालिसाचे हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मोनालिसाचे हे फोटो चाहत्यांनाही आवडले आहेत. अनेक चाहत्यांनी या बोल्ड फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे.