इमारतीवरून होऊ लागला पैशांचा पाऊस : त्या ‘रॉबिनहूड’ ला बेड्या 

हाँगकाँग : वृत्तसंस्था – ‘पैशांचा पाऊस’ ही खरंतर स्वप्नवत कल्पना आहे. पण हाँगकाँग मधील एका उंच इमारतीवरून अचानक चक्कं पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि हे पैसे गोळा करण्यासाठी अनेकांची झुंबड लागली. मात्र हा पैसा नक्की आला कुठून असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हाँगकाँगमधील एका बड्या बापाच्या पोराने दानशूर असल्याचे दाखवून सहानुभूती मिळवण्यासाठी उंच इमारतीवरून तब्बल 20 हजार पौंड म्हणजे सुमारे 18 लाख रुपयांच्या नोटा उधळल्या ! मात्र स्वत:ला रॉबिनहूड बनवू पाहणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हाँगकाँगमधील वोेेंग चिंग-किट नावाच्या या तरुणाने श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करीत हा ‘दानधर्मा’चा प्रकार केला. त्याने आपल्या महागड्या गाडीतून नोटांचे पुडके भरून आणले आणि या नोटा त्याने एका उंच इमारतीवरून रस्त्यावर भिरकावल्या! गरिबांची मदत करण्यासाठी म्हणून त्याने तब्बल २० हजार पौंड म्हणजे सुमारे १८ लाख रुपयांच्या नोटा उधळल्या !
२४ वर्षांच्या वोंगने केलेल्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. खरे तर त्याला गरिबांची कणव असण्यापेक्षा लोकांच्या नजरेत आपण ‘हीरो’ कसे ठरू, याची अधिक चिंता होती. त्याने नोटांचा पाऊस सुरू केल्यावर अर्थातच रस्त्यावरील लोकांनी त्या गोळा करण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ माजला. कुणी तरी याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तत्काळ तिथे येऊन वोंगला अटक केली. वोंगने हा सर्व प्रकार फेसबुक लाईव्ह करूनही दाखवला होता. मला ‘रॉबिनहूड’ बनण्याची इच्छा होती, असे त्याने पोलिसांना सांगितले.
You might also like