लेकीच्या प्रेमासाठी बापानं चक्क ‘मीनी रिक्षा’ साकारली

तिरुअनंतरपुरम : वृत्तसंस्था – आजकाल लहान मुलं नेमके कसले हट्ट करतील सांगता येत नाही. मुलांचे हे हट्ट पुरवण्यासाठी पालकही प्रयत्न करत असतात. अशाच एका बापाने आपल्या लेकीचा अजब हट्ट पूर्ण केला आहे. या बापाने चक्क हुबेहूब दिसणारी मिनी ऑटो तयार केली आहे. सामान्य ऑटोप्रमाणेच ही ऑटो आहे. केरळमधील बाप-लेकीची जोडी आहे.

केरळमधील अरूण कुमार पुरूषोत्तम यांनी ही ‘मिनी ऑटो’ तयार केली आहे. ही ऑटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अरूण यांच्या मुलांची इच्छा होती ती तिच्याजवळ एक ऑटोरिक्षा असावी. शासकीय रूग्णालयात काम करणाऱ्या अरूणकुमारकडे मोठी रिक्षा घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र इच्छाशक्ती असल्याने त्यांनी अवघ्या साडेसात महिन्याच्या कालावधीत मिनी ऑटो बनवली.

ही फक्त खेळण्यातील ऑटो नाही तर बसण्याची जागा, ड्रायव्हरची सीट, हॉर्न, आरसे देखील हुबेहुब आहे. एवढंच नाहीतर डीसी मोटारच्या सहाय्याने ती मोठ्या ऑटो रिक्षाप्रमाणे धावते सुद्धा, मोठ्या ऑटोरिक्षात जे फंक्शन असतात ते फंक्शन या मिनी ऑटोमध्येही आपल्याला पाहायला मिळतात. या रिक्षाचं नाव सुंदरी असं ठेवलं आहे. या ऑटोमध्ये मोबाईल चार्जरची सुविधाही करण्यात आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हीडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतं आहे. तसंच या बाप-लेकीचं प्रेम पाहून अनेक लोक सोशल मीडियावर त्यांची प्रशंसा करत आहेत.