Monthly Rashifal 2021 : कोणत्या राशीसाठी आनंदाची भेट घेऊन येइल फेब्रुवारी ? 5 राशींवर मोठा परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ज्योतिषतज्ज्ञांनुसार, फेब्रुवारी महिना अनेक राशींसाठी खुप शुभ ठरणार आहे. पैसा, व्यापार, आरोग्य आणि घरात सुख-शांतीच्या बाबतीत अनेक लोकांना चांगले फळ प्राप्त होईल. या महिन्यात मेष, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन राशीमध्ये मोठे फेरबदल दिसून येतील. 2021 चा दुसरा महिना कोणत्या राशींसाठी शुभ असेत आणि कुणाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ते जाणून घेवूयात…

मेष –
मेष राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी महिना खुप चांगला आहे. जोश आणि उत्साहाची कमतरता भासणार नाही. कामांमध्ये चांगले परिणाम प्राप्त करून यश मिळवाल. मित्रांकडून आर्थिक सहाय्य मिळू शकते. यादरम्यान मित्रांच्या मदतीची गरज असेल तर निसंकोच त्यांना सांगा. ते तुमची मदत करतील. महिन्याच्या उत्तरार्धात थोडे लक्ष द्या, कारण वागण्यात बदल होतील, जे जीवनाला प्रभावित करतील.

वृषभ –
लांबचा प्रवास होईल. धाडस आणि पराक्रम वाढेल. आव्हानांना तोंड देत पुढे जाणे पसंत कराल. जीवनात यश प्राप्त होईल. सर्वात चांगली बाब म्हणजे या महिन्यात आपले घर उभारण्याबाबत मोठा निर्णय घ्याल. कुटुंबियांना खुप आनंद होईल. 22 फेब्रुवारीपासून मंगळाने आपल्या राशीत गोचर केल्यानंतर तुमच्या वागण्यात बदल होतील. वागण्यात चिडचिडेपणा आणि राग यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन –
या महिन्यात भाग्याची पूर्ण साथ मिळेल. कामात यश मिळेल. जीवनात काही घटना अचानक घडतील, कारण गुरू शुक्र, शनी आणि सूर्य तुमच्या कुंडलीत आठव्या स्थानात आहेत. आठवे स्थान अनिश्चिततेचे स्थान आहे, यासाठी काही चांगले तर काही वाईट परिणाम प्राप्त होऊ शकतात.

कर्क –
हा महिना अनेक संधी घेऊन येत आहे. स्वताला ओळखण्याची आवश्यकता भासेल. यश मिळण्याचे योग आहेत. मानसिकद़ृष्ट्या खुप दबाव जाणवेल. उत्तरार्धात धनहानीचे योग आहेत, यासाठी सावधगिरीने पैशांचा वापर करावा लागेल.

सिंह –
हा महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. जर बँक लोक घेण्यात काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. अहंकारापासून दूर राहावे लागेल. कारण तो तुमचा सर्वात मोठा शत्रु असेल. महिन्याच्या सुरूवातीला छोट्या भावंडाशी संबंध बिघडू शकतात. जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. यामुळे नाते मजबूत होईल.

कन्या –
जर अजूनही सिंगल असाल तर समजून जा की तुमचे मिंगल होण्याची वेळ आली आहे. या व्हॅलेंटाइन डे ला खास व्यक्तीसोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळू शकते. मात्र, या महिन्यात सर्वात जास्त लक्ष आरोग्याकडे द्यावे लागेल. जास्त प्रवास करावा लागेल, परंतु हे प्रवास लाभदायक ठरतील. कार्यक्षेत्र असो की अभ्यास सर्वत्र बुद्धीचा लाभ मिळेल.

तुळ –
सुखप्राप्तीसाठी खुप मेहनत करावी लागेल. लोकांसमोर एक वेगळी ओळख तयार होईल जी तुम्हालाही आवडेल. मित्रांसोबत चांगले जमेल आणि त्यांच्यामुळे कामांमध्ये यश मिळेल. ते प्रत्येक कामात मदत करतील, एका चांगल्या साथीदाराचा रोल पार पाडतील. अन्य बाबतीत स्थिती अगोदरप्रमाणे सामान्य राहील.

वृश्चिक –
नोकरी किंवा व्यापाराच्या बाबतीत मित्र आणि नातेवाईकांशी चर्चा वाढेल. जीवनात सुखाचा अनुभव येईल आणि कौटुंबिक जीवनासाठी वेळ द्याल. घरात सर्व ठिक चालेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तिसर्‍या आठवड्यात सकारात्मक बदल होतील. 21 तारखेनंतर स्थितीत जास्त सुधारणा होईल, कारण शुक्र तुमच्या बाराव्या स्थानाचा स्वामी होऊन चौथ्या भावात गोचर करेल. या कारणामुळे लाभ मिळेल.

धनु –
नोकरीच्या शोधात असाल तर या महिन्यात मुलाखतीसाठी अनेक ठिकाणी जावे लागेल. खुप मेहनत करावी लागेल, कारण हा महिना मेहनत करून घेऊन चांगले फळ देण्याच्या विचारात आहे. आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्या. जर दृढ इच्छाशक्ती ठेवली तर कोणतीही समस्या टिकणार नाही.

मकर –
अनेक कामे तुमच्या प्राथमिकतेच्या यादीत असतील. 4 फेब्रुवारी बुध तुमच्या कुंडलीच्या प्रथम स्थानात वक्री आवस्थेत प्रवेश करेल. ही स्थिती तुमची आव्हाने आणखी वाढवणार आहे. बुद्धी एकाच कामाबाबत वारंवार विचार करण्यास भाग पाडेल. गोंधळात पडलेले असाल.

कुंभ –
खुप विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. कारण खर्चात वाढ होण्याचे योग आहेत. या महिन्यात सर्वात जास्त आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल आणि मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. मित्रांशी संबंध चांगले राहतील. जॉब बदलायचा असेल तर या महिन्यात यश मिळू शकते.

मीन –
हा महिना चांगले परिणाम देईल. 4 फेब्रुवारीला बुधाचे गोचर सुद्धा वक्री आवस्थेत तुमच्या एकदाश स्थानात होईल. पाच ग्रह तुमच्या एका स्थानात असल्याने आर्थिक प्रगती वेगाने होईल. अनेक लोकांशी संपर्क आल्याने कामात मदत होईल. 12 फेब्रुवारीनंतर जेव्हा शनी अस्त आवस्थेतून बाहेर पडेल तेव्हा उत्पन्न आणखी वेगाने वाढेल.