पद्म पुरस्कारांसाठी तब्बल ११ हजारांपेक्षा जास्त अर्ज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत सरकारकडून देण्यात येणारे ( पद्म ) सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रत्येक वर्षी गणराज्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात येतात. यंदाच्या पद्म’ पुरस्कारांसाठी आतापर्यंत तब्बल १० हजारांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. गेल्या वर्षी पद्म पुरस्कारासाठी ३५ हजार अर्ज आले होते. त्यापैकी ८५ जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
[amazon_link asins=’B07CSTV4B8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a39e98c9-9985-11e8-9637-952b730250e8′]

२०१९च्या पद्म पुरस्कारासाठी आतापर्यंत ११ हजार ४७५ अर्ज आले आहेत. त्यापैकी १० हजार ४५३ अर्जांचा विचार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१८ आहे.

भारत सरकारने १९५४ मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण केले. यापैकी पद्म पुरस्कार हा पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा वर्गांत विभागून देण्यात येत असे. ८ जानेवारी १९५५च्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे ह्या वर्गांना अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आली.

असा करावा लागतो अर्ज –
पद्म पुरस्कारासाठी केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करता येतो. यासाठी www.padmaawards.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतात. या साठी मे महिन्यापासून अर्ज मागविले जातात. ५ सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जातून विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना पुढील वर्षी (२६ जानेवारी २०१९) रोजी पुरस्कार दिले जातील.
[amazon_link asins=’B0734VTNJ2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1f00f5b-9985-11e8-af8f-7fd88a75febb’]

यांच्याकडून होते निवड –
पद्म पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांकडून प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. ह्या समितीला पद्म-पुरस्कार-समिती असे म्हणतात. मंत्रिमंडळ-सचिव (कॅबिनेट सेक्रेटरी) हे ह्या समितीचे प्रमुख असून गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव ,चार ते सहा ख्यातनाम व्यक्ती समितीत सदस्य म्हणून समाविष्ट असतात.