सध्या बहुतांश लोकांना खरेदी करायचंय आपलं घर, इथं जाणून घ्या याचे मोठे कारण

नवी दिल्ली : कोरोना महामारीने लोकांना आपल्या घराचे महत्व दाखवून दिले आहे. यासोबतच बँकांमध्ये सध्या सर्वात कमी दरावर होमलोन उपलब्ध केले जात आहे. तर कोविड-19 मधून सावरण्यासाठी रियल इस्टेट सेक्टरसुद्धा आकर्षक ऑफर देत आहे. यासाठी बहुतांश लोकांना अगामी काळात स्वत:चे घर खरेदी करायचे आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म नोब्रोकर डॉट कॉमने नुकताच एक सर्वे केला आहे. ज्यानुसार 82 टक्के लोकांना 2021 मध्ये प्रॉपर्टी खरेदी करायची आहे. तर कंपनीच्या मागील वर्षाच्या सर्वेमध्ये केवळ 64 टक्के लोकांनाच घर खरेदी करायचे होते.

18 हजार लोकांनी सर्वेमध्ये घेतला सहभाग
नोब्रोकर डॉट कॉमनुसार त्यांच्या ऑनलाइन सर्वेत 18 हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला. ज्यापैकी 89 टक्के लोकांना वाटले की, सध्या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी चांगला काळ आहे. यासाठी लोकांनी सर्वात मोठे कारण होमलोनचे कमी असलेले दर सांगितले.

होमलोनवर इतके व्याज
सध्या बहुतांश बँका 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत होमलोनवर 6.95 टक्केच्या दराने लोन देत आहेत. जर यापेक्षा जास्त लोन घेतले तर 7 टक्के दराने लोन मिळते. म्हणून जास्तीत जास्त लोकांना प्रॉपर्टी खरेदी करायची आहे.

मेट्रो शहरांमध्ये सर्वे
यामध्ये म्हटले आहे की, लोक मोठ्या घरांचा शोध घेत आहेत. यामध्ये काम करण्यासाठी त्यांना दोन खोल्या हव्या आहेत. यामध्ये मुलांना अभ्यासासाठी वेगळी खोली असावी. नो ब्रोकर डॉट कॉमचे सह-संस्थापक सौरभ गर्ग यांनी म्हटले, 82 टक्के लोकांनी 2021 मध्ये घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान खर्च कमी झाल्याने लोकांनी जास्त बचत केली आहे. डाऊनपेमेंटसाठी त्यांनी पैसे जमा केले आहेत. बिल्डरच्या आकर्षक ऑफर आणि कमी व्याजदर सुद्धा ग्राहकांना आकर्षित करत आहेत.