Mother On Rent | कॅन्सरने झाला खर्‍या आईचा मृत्यू, तेव्हा महिलेने भाडेतत्वावर आणली दुसरी; 13 वर्ष भाडे देऊन ठेवली बनावट ‘मम्मी’

बिजिंग : वृत्तसंस्था –  नाती खुपच कॉम्प्लिकेटेड असतात. अनेकदा काही चांगले करण्यासाठी लोकांना इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे लागते. असेच काहीसे चीनमधील एका महिलेला करावे लागले. या महिलेच्या आईचा मृत्यू लंग कॅन्सर (Lung Cancer) ने झाला होता. परंतु तिला भीती होती की ही बातमी तिची आजी सहन करू शकणार नाही. या कारणामुळे तिने एक बनावट मम्मी भाडेतत्वावर आणली जी तिच्या आजीशी दररोज मुलगी बनून बोलत असते (Mother On Rent). महिलेचा हा निर्णय लोकांना खुपच भावला. Mother On Rent | woman hired fake mother on rent for 13 years shares heartbreaking reason

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

46 वर्षांची चेंग (Cheng) मागील 13 वर्षापासून भाडेतत्वावर ठेवलेल्या आईला पेमेंट करत आहे. तिची आई आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. परंतु लंग कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला. चेंगला जाणवले की आपली मुलगी गेल्याचे दुख तिच्या आजीला सहन होणार नाही. याच कारणामुळे खुप विचार करून तिने एका महिलेला भाड्याने आपली आई बनवले. ही महिला चेंगकडून मिळालेल्या भाड्याच्या बदल्यात दररोज तिच्या आजीसोबत मुलगी बनून विविध प्रकारच्या गोष्ट बोलत होती. यामुळे चेंगच्या आजीला विश्वास होता की, तिची मुलगी सुरक्षित आहे.

आईला सत्य समजले

हा प्रकार आता चेंगने सोशल मीडियावर शेयर केला आहे. चीनच्या क्सीजनयांगमध्ये राहणार्‍या चेंगने सांगितले की, तिच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा तिला सर्वात जास्त चिंता तिच्या आजीची होती. याच दरम्यान तिला एक महिला भेटली जिचा आवाज तिच्या आईशी मिळता जुळता होता. तेव्हा तिच्या डोक्यात ही आयडिया आली. मात्र, आजीने आपल्या मुलीचा आवाज ओळखून म्हटले ही माझी मुलगी नाही. नंतर चेंगने फ्लूमुळे आवाज बदलल्याचे सांगून आजीला समजावले. भाडेतत्वावरील ही आई रोज चेंगच्या आजीला फोन करून तासानतास बोलत असे. चायना डेलीला मुलाखतीत तिने सांगितले की, आता तिच्या आजीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे ती खुलासा करत आहे.

Web Title : Mother On Rent | woman hired fake mother on rent for 13 years shares heartbreaking reason

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CM Uddhav Thackeray । शिवसेनेचं ‘मिशन महाराष्ट्र’; CM उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र

Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यासह त्याच्या मित्राला सक्तमजुरीची शिक्षा

Pimpri News | अविनाश चिलेकर यांची ‘डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र’च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती