Multiplex मध्ये फक्त 50 रुपयांत पाहता येणार ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’ सह ‘हे’ ब्लॉकबस्टर सिनेमे !

पोलीसनामा ऑनलाइन – पीव्हीआर सिनेमाज (PVR Cinemas), आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलीस (Cinepolis) या 3 कंपन्यांनी प्रेक्षकांना सिनेमा हॉलकडे आकर्षित करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. दिवाळीनिमित्त यश राज फिल्म्सची (Yash Raj Films)दिखामदार 50 वर्षे साजरी केली जाणार आहेत. वायआरएफनं मल्टिप्लेक्ससाठी त्यांच्या सिनेमांची लायब्ररी कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत प्रेक्षकांना वायआरएफचे सिनेमे मल्टिप्लेक्समध्ये फक्त 50 रुपयांत पाहता येणार आहेत.

कोरोना व्हायरसमुळं (Coronavirus) केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड निर्देशांनुसार, गेली 7 महिने झाली आहेत देशातील थिएटर्स बंद झाले होते. उत्पन्नही पूर्णपणे ठप्प झालं होतं. त्यामुळं यश राज फिल्म्सच्या बिग स्क्रीन सेलिब्रेशन उपक्रमाच्या माध्यमातून टॉप मल्टिप्लेक्स चेन्सला एकत्र आणून थिएटर व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा हा प्रयत्न आहे.

YRF बिग स्क्रीन सेलिब्रेशन आहे तरी काय ?

YRF बिग स्क्रीन सेलिब्रेशन या उपक्रमाअंतर्गत देशभरातील मल्टिप्लेक्समध्ये कभी कभी, सिलसिला, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, दिल तो पागल है, वीर जारा, बंटी और बबली , रबने बना दी जोडी, एक था टायगर, जब तक है जान, बँड बाजा बारात, सुलतान, मर्दानी, दम लगा के हैशा, यांसह इतर अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे पुन्हा प्रदर्शित केले जाणार आहेत. खास बात अशी की हे सिनेमे प्रेक्षकांना फक्त 50 रुपयांत बघता येणार आहेत. वायआरएफचे मार्केटिंग आणि मर्चंडायजिंग विभागाचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट मेहता यांनी याबाबत माहिती दिली आहे.